देशातील प्रमुख आठ क्षेत्रातील वाढ २०१४ अखेर आक्रसली आहे. डिसेंबरमध्ये २.४ टक्के दर साधताना प्रमुख उद्योग क्षेत्राने गेल्या तीन महिन्याचा तळ गाठला आहे.
डिसेंबर २०१४ मध्ये कच्चे तेल, नैसर्गिक वायू तसेच खते व पोलाद उत्पादन क्षेत्राची वाढ कमी झाली आहे. प्रमुख आठ क्षेत्रांची दोन महिन्यांपूर्वीची वाढ ही निम्म्यावर आली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती ४ टक्के होती. सिमेंट, वीज यासह प्रमुख क्षेत्राची वाढ नोव्हेंबरमध्ये ६.७ टक्के होती. हे प्रमुख क्षेत्र एकूण औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात ३८ टक्के हिस्सा राखते. डिसेंबर २०१४ मध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन १.४ टक्क्य़ांनी घसरले. तर नैसर्गिक वायू उत्पादन ३.५ टक्क्य़ांनी कमी झाले. खते व पोलाद निर्मिती अनुक्रमे १.६ व २.४ टक्के कमी राहिली. २०१४ अखेरच्या महिन्यात कोळसा उत्पादन ७.५ व सिमेंट उत्पादन ३.८ टक्के झाले. वीज निर्मिती ३.७ टक्क्य़ांनी घसरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा