मेक इन इंडिया सप्ताहासाठी
‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या निमित्ताने येत्या शनिवारपासून देशाच्या आर्थिक राजधानीत भरणाऱ्या गुंतवणूक मेळाव्यात आपल्या व्यवसायविस्तार, उत्पादननिर्मिती वाढ तसेच देशातील स्थान अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्याही उतावीळ झाल्या आहेत. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भारतातील गुंतवणुकीचे कोटय़वधी डॉलरचे आकडे तसेच उत्पादननिर्मिती, व्यवसायवाढ याबाबतची घोषणा करण्यासाठी या कंपन्या सज्ज आहेत.
माहिती तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी असलेल्या ऑरेकल कॉर्पोरेशनने तिच्या भारतातील व्यवसायविस्ताराच्या घोषणेकरिता हा सोहळा मुहूर्त म्हणून निवडला आहे. यासाठी खुद्द कंपनीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्झ या उपस्थित राहणार आहेत. कंपनीच्या ताफ्यात असलेल्या एकूण १.३० लाख कर्मचाऱ्यांपैकी ४० हजार कर्मचारी हे भारतातील आहेत. जगभरात नऊ विभागीय केंद्रे असलेल्या ऑरेकलच्या या क्षेत्रातील भारताच्या विस्ताराबाबतचे संकेत कार्ट्झ यांनी दिले आहेत.
जर्मन बनावटीच्या वाहनांच्या निर्मितीतील आघाडीच्या फोक्सव्ॉगनने तिच्या नवागत अमेओच्या परिपूर्ण निर्मितीकरिता भारत हेच निर्मिती केंद्र निश्चित केले आहे. २०१६ व २०१७ हे वर्ष कंपनीच्या दृष्टीने कंपनीकरिता खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ साध्य करण्याकरिता महत्त्वाचे असल्याचे कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक डॉ. अ‍ॅन्ड्रस लुरमॅन यांनी दिल्लीनजीक नुकत्याच झालेल्या वाहन प्रदर्शनादरम्यान सांगितले होते. यानुसार कंपनी तिच्या पुण्यातील (चाकण) प्रकल्पातून विद्यमान पोलो, व्हेंटोसह नव्या अमेओची १०० टक्क्यांपर्यंतच्या निर्मितीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कंपनी येथून तयार होणाऱ्या वाहनांकरिता अमेरिका, आशिया व आफ्रिका भागांतील ३५ देश हे निर्यात बाजारपेठ म्हणून पाहत असल्याचेही सांगण्यात येते.
शीतपेय निर्मितीतील आघाडीच्या अमेरिकेतील कोका कोलामार्फतही सप्ताहाचे औचित्य साधून व्यवसायविषयक मोठी घोषणा होणार आहे. कंपनीच्या भारतातील व्यवसायाचे वेगवेगळे टप्पे सहा दिवसांच्या कार्यकाळात मांडण्यात येणार असून स्थानिक पातळीवर होणाऱ्या भागीदारीबाबतही या दरम्यान विस्ताराने सांगितले जाईल. महाराष्ट्रात तीन प्रकल्प असलेल्या सीमेन्सकडून उत्पादननिर्मिती तसेच संशोधन व विकास क्षेत्रातील व्यवसाय विस्ताराच्या दिशेनेही चालू सप्ताहादरम्यान पावले पडण्याची चिन्हे आहेत.

‘अ‍ॅक्रेक्स’कडूनही सहभागाची तयारी
मुंबई : केंद्राने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट सिटी’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी महत्त्वाची भूमिका असणाऱ्या एअर कंडिशिनग, व्हेंटिलेशन, रेफ्रिजरेटिंग आणि बििल्डग सíव्हसेस क्षेत्रानेही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा पुरस्कार केला आहे. मुंबईतील नियोजित सप्ताहानंतर या उद्योगाचे आशियातील सर्वात मोठे २६वे अ‍ॅक्रेक्स २०१६ हे प्रदर्शन गोरेगावस्थित मुंबई प्रदर्शन संकुलात २५ ते २७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान आयोजण्यात आले आहे. आयशेअर, द इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशिनग इंजिनीअर्स या आयोजनात पुढाकार असलेल्या संस्थांनी हे क्षेत्र म्हणजे ‘मेक इन इंडिया’ हा अगणित संधी देणारा उपक्रम असल्याचे आवर्जून नमूद केले. विशेषत: पीपीपीच्या माध्यमातून कोल्ड चेन, त्यासंबंधी पायाभूत सुविधा आणि ऊर्जापुरवठय़ाच्या विकासाला चालना मिळेल.

Story img Loader