‘व्हॉट्स अॅप’वर एकत्र आलेल्या एका गटाचा प्रवास वर्षभरातच संकेतस्थळाच्या दिशेने फळला आहे. केवळ मराठी उद्योजकांसाठी तयार झालेल्या या ‘ग्रुप’चे रूपांतर संकेतस्थळात झाले आहे. मराठी उद्योजकांना एकत्र आणणाऱ्या ‘मराठी उद्योजक’ या व्यासपीठाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन ‘जुन्नर चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष अमित बेनके यांच्या हस्ते नुकतेच झाले. पुणेनजीकच्या राजुरी गावातील पराशर कृषी पर्यटन केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक येथील ‘मराठी उद्योजक’ सदस्यांनी व्यापारविषयक आदान-प्रदान केले.
वर्षभरापूर्वी ‘व्हाट्स अॅप’वर मराठी उद्योजकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर ‘जगदाळे व्हेन्चर्स’ने या ‘ग्रुप’चे http://www.marathiudyojak.in मध्ये रूपांतर केले आहे. ‘पंकज इन्फोटेक’चे संस्थापक पंकज यादव यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. मराठी उद्योजक, त्यांचा व्यवसाय तसेच उत्पादनाविषयीची इत्थंभूत माहिती या पटलावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी अमित बेनके म्हणाले की, केवळ मराठी उद्योजकांसाठी कार्यरत या व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील उद्योजकांबरोबरच देश-विदेशातील मराठी उद्योजकही जगासमोर येणार आहेत. तर प्रसिद्ध अभिनेता संदीप कुलकर्णी यांनीही या संकेतस्थळाबद्दल, माझ्यासारख्या चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीही या माध्यमातून या व्यासपीठाशी जोडले जात असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.
मराठी उद्योजकतेचे ‘व्हॉट्स अॅप’ ते ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू’कडे संक्रमण!
‘व्हॉट्स अॅप’वर एकत्र आलेल्या एका गटाचा प्रवास वर्षभरातच संकेतस्थळाच्या दिशेने फळला आहे. केवळ मराठी उद्योजकांसाठी तयार झालेल्या या ‘ग्रुप’चे रूपांतर संकेतस्थळात झाले आहे.
First published on: 19-08-2014 at 12:20 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi entrepreneur on whatsapp created website