मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी शेवटच्या सत्रात कोसळून २५,००० च्या खाली जाऊन पोहचला. जागतिक पातळीवर विकासदराबद्दल असलेले चिंतेचे वातावरण, परकीय गुंतवणूकदारांनी बाजारातून काढून घेतलेले भांडवल आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढविण्याची शक्यता अशा तिहेरी घटकांमुळे सेन्सेक्स गेल्या १५ महिन्यांतील २४,८९३.८ या निच्चांकी पातळीवर जाऊन पोहचला. विशेष गोष्ट म्हणजे मोदी सरकारने सत्तारोहण केल्याच्या दिवशी बाजार याच पातळीच्या जवळपास म्हणजे २४,७१६ वर बंद झाला होता. मोदी सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था जोमाने विकास करेल, असा अनेकांचा होरा होता.
तत्पूर्वी शेवटच्या सत्रात चिंतेच्या वातावरणामुळे बाजारातील गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळे सेन्सेक्स २५,००० ची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडून २४,८९३.८ वर जाऊन पोहचला. त्याचबरोबर चीनमधील मंदीच्या वातावरणाचाही परिणाम गुंतवणूकदारांवर पहायला मिळाला. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रूपयाचे अवमुल्यन होऊन तो दोन वर्षांपूर्वीच्या ६६.८३ या पातळीवर जाऊन पोहचला.
सेन्सेक्स २५००० च्या खाली, गेल्या १५ महिन्यांतील निच्चांकी पातळीवर
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी शेवटच्या सत्रात कोसळून २५,००० च्या खाली जाऊन पोहचला.
Written by रोहित धामणस्कर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-09-2015 at 18:21 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market back to levels when modi came to power