आघाडीच्या कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्ष जाहीर करताना निराशा केल्याने सेन्सेक्ससह निफ्टीने सलग तिसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविली. माहिती तंत्रज्ञान समभागांवरील मूल्यदबाव बुधवारीही दिसून आला.
६६.८७ अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,७७९.६६ पर्यंत खाली आला. तर २३.८० अंश घसरणीसह निफ्टी ८,१०७.९० वर स्थिरावला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित सप्टेंबरचा महागाई निर्देशांक सलग ११ व्या महिन्यात कमी राहिल्याने बाजारात मोठी घसरण नोंदली गेली नाही.
टाटा समूहातील टीसीएसपाठोपाठ हिंदुस्थान यूनिलिव्हरचे वित्तीय निकाल गुंतवणूकदारांच्या हेतूने निराशाजनक राहिल्याचे बाजारातील घसरणीच्या व्यवहारातून दिसले. टीसीएसबरोबरच विप्रो या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अन्य कंपनीचे समभाग मूल्यही बुधवारी रोडावले.
गेल्या तीन व्यवहारांतील मुंबई निर्देशांकाचे ३०० अंशांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सेन्सेक्समधील निम्मे समभाग घसरणीच्या यादीत राहिले. त्यातही आघाडी अर्थातच ४.३९ टक्क्यांसह टीसीएसचीच होती. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान १.३२ टक्क्यांसह घसरणीत वर होता.
सलग तिसऱ्या सत्रात ‘सेन्सेक्स’ची घसरण
माहिती तंत्रज्ञान समभागांवरील मूल्यदबाव बुधवारीही दिसून आला.
Written by रोहित धामणस्कर
First published on: 15-10-2015 at 07:33 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market falls in third consecutive session