अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध मिटण्याकडे पहिले पाऊल पडले असून, याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला. गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यानं शेअर बाजारानं ऐतिहासिक उसळी घेतली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १७७ अंकांनी वधारून ४२०५० अंकावर पोहोचला.

अर्थसंकल्पाचे वेध लागलेले असतानाच अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारी संघर्ष मिटल्यानं जागतिक बाजारपेठेवर याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. गेल्या १८ महिन्यापासून अमेरिका व चीनमधील व्यापारी संबंध बिनसले होते. त्यानंतर दोन्ही देशात समेट घडून आला आहे. त्याचबरोबर १ फेब्रुवारीला देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला जाणार असून, या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर जागतिक गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. सकाळच्या सत्रात शेअर बाजार बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) १७७ अंकानी वधारत ४२ हजार अंकांवर पोहोचला आहे. तर तर निफ्टीही (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) ५० अंकांनी वधारला. १२,३७४.२५ वरून १२३८९.०५ अंकांवर पोहोचला.

दोन दिवसापूर्वी अर्थात सोमवार अखेर मुंबई निर्देशांक २५९.९७ अंश वाढ नोंदवित प्रथमच ४१,८५९.६९ वर पोहोचला. तर ७२.७५ अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक दिवससमाप्तीला १२,३२९.५५ पर्यंत स्थिरावला. सत्रातील ३०० अंशपर्यंतच्या उसळीने सेन्सेक्स व्यवहारात ४१,९०० च्या उंबरठय़ावर पोहोचला होता.

Story img Loader