सुधीर जोशी
जागतिक बाजारात आलेल्या विक्रीच्या दबावामुळे भारतीय बाजारात विक्रीच्या लाटा येतच होत्या. गुरुवारी या लाटेचे रूपांतर त्सुनामीत झाले. ब्रिटनसह युरोपातील काही देशांत करोना लाटेच्या नव्या उद्रेकामुळे पुन: टाळेबंदी जाहीर होण्याची शक्यता, काही परदेशी बँकांमधे निधी हस्तांतरणाचे बेकायदेशीर व्यवहार तसेच अमेरिकी अर्थव्यवस्थेची संभाव्य लांबणारी फेरउभारी हे घटक त्यासाठी कारण ठरले. आर्थिक वस्तुस्थितीशी फारकत घेऊन वर जाणाऱ्या बाजाराला मोठा धक्का देण्यासाठी वायदे बाजाराच्या मासिक सौदापूर्तीच्या दिवसाचा मुहूर्त साधला गेला. शेवटच्या दिवशी बाजार सावरूनही साप्ताहिक तुलनेत ‘सेन्सेक्स’मध्ये १,४५७ अंशांची तर निफ्टी निर्देशांकात ४७० अंशांची घसरण झाली.
गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळालेल्या रूट मोबाइल कंपनीच्या समभागांची बाजारात सूचिबद्धता प्रारंभिक विक्रीच्या (रु. ३५०) दुप्पट किमतीला झाली. सप्ताहअखेर तर समभागाची किंमत अडीच पट झाली. कॅम्स व केमकॉन स्पेशालिटी केमिकल्स या कंपन्यांच्या प्रारंभिक भागविक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारात रोकडसुलभतेची कमी नाही हेच यावरून दिसून आले. परंतु अवास्तव तेजीत चढय़ा भावात प्राथमिक विक्री करू इच्छिणाऱ्या एंजल ब्रोकिंगच्या प्रवर्तकांना बाजाराने वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या बहुप्रतीक्षित यूटीआय एमसीच्या प्रारंभिक समभाग विक्रीलाही असाच प्रतिसाद अपेक्षित आहे. गुंतवणूकदारांनी त्याचा अवश्य फायदा घ्यावा.
ग्रामीण भागातील चांगल्या बस्तानामुळे हेडेलबर्ग सिमेंटने करोना काळातही चांगली कामगिरी केली आहे. कंपनीची रोकडसुलभता व उत्पादन क्षमता चांगली आहे. नजीकच्या काळात फारसा भांडवली खर्च योजलेला नाही. त्यामुळे जर करोनाचे संकट आटोक्यात राहिले तर पावसाळ्यानंतर वाढणाऱ्या मागणी व किमतींचा फायदा कंपनी घेऊ शकेल. अचानक कोसळलेला बाजार गुंतवणूकदारांसाठी नेहमीच संधी घेऊन येत असतो. करोना संकटाने आरोग्यनिगा व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रे अजून एक-दोन वर्षे प्रकाशात राहतील. रिलायन्स इंडस्ट्रीजने नवा आध्याय सुरू केला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था तुलनेने लवकर सावरेल. हे ध्यानात ठेवून गुंतवणुकीची संधी घ्यायला हवी.
sudhirjoshi23@gmail.com