महागाईला प्राधान्य आणि रोकड उपलब्धतेवर लक्ष अशा रिझव्र्ह बँकेच्या दुहेरी पतधोरण निर्णयाने भांडवली बाजारात मंगळवारी कमालीचा उत्साह संचारला. एकाच व्यवहारात त्रिशतकी अंश वाढ नोंदवत सेन्सेक्स २१ हजारांच्या समीप पोहोचला. ३५८.७३ अंश वाढीमुळे मुंबई निर्देशांक २०,९२९.०१ या गेल्या तीन वर्षांनंतरच्या सर्वोच्च स्थानी पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ११९.८० अंश भर पडल्याने सर्वात मोठा हा बाजारदेखील ६,२२०.९० अशा नोव्हेंबर २०१० नंतरच्या वरचा टप्पा गाठता झाला.
डॉ. रघुराम राजन यांच्या दुसऱ्या तिमाही पतधोरणाच्या लाटेवर मंगळवारी स्वार झालेल्या सेन्सेक्सने गेल्या सलग पाच सत्रांत मिळून ३२४ अंश आपटी नोंदविली आहे. भांडवली बाजाराची व्यवहाराची सुरुवात काहीशी नरम झाली. पाव टक्का रेपो दर वाढीनंतरही सेन्सेक्स अवघ्या ५० अंशांचीच वाढ राखत होता. मात्र दुपापर्यंत ती विस्तारत गेली. दिवसअखेर तिने मोठी झेप घेतली. एकाच व्यवहारातील या तेजीमुळे गुंतवणूकदारांची मालमत्ताही एक लाख कोटींनी वधारली.
१३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकात बँकच आघाडीवर राहिला. सेन्सेक्समध्ये वित्तीय क्षेत्राशी संबंधित कंपनी समभागांचा निम्मा हिस्सा आहे. त्याचबरोबर वाहन व बांधकाम समभागांमध्येही तेजी नोंदविली गेली. त्यांची वाढ अनुक्रमे २.४३ व २.४४ टक्के होती. सेन्सेक्समधील केवळ एका समभागाने घसरण राखली. सेन्सेक्स यापूर्वी ९ नोव्हेंबर २०१० रोजी २०,९३२.४८ वर होता. तर जवळपास २ टक्क्यांची वाढ राखणारा निफ्टीनेही तीन वर्षांच्या फरकाने ६२०० पल्याड टप्पा मंगळवारी गाठला.
पतधोरणाने भांडवली बाजाराला ऊर्जा
महागाईला प्राधान्य आणि रोकड उपलब्धतेवर लक्ष अशा रिझव्र्ह बँकेच्या दुहेरी पतधोरण निर्णयाने भांडवली बाजारात मंगळवारी कमालीचा उत्साह संचारला.
First published on: 30-10-2013 at 12:29 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markets cheer rbi policy sensex up 330 points