हॅचबॅक श्रेणीतील सेलेरिओ प्रवासी कारद्वारे जपानच्या सुझुकीने डिझेल इंजिन निर्मितीत प्रवेश केला आहे. मारुती सुझुकी इंडियाने सेलेरिओ ही कार गुरुवारी नवी दिल्लीत नव्याने सादर केली.
नवी दिल्लीत बुधवारी ही कार सादर करताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची आयुकावा व विपणन व विक्री विभागाचे कार्यकारी संचालक आर. एस. कलसी हे उपस्थित होते.
७९३ सीसी क्षमतेच्या नव्या सेलेरिओची किंमत ४.६५ ते ५.७१ लाख रुपये आहे. प्रतिलिटर २७.६२ किलोमीटर वेग क्षमता देणाऱ्या या कारमध्ये डीडीआयएस १२५ इंजिन बसविण्यात आले आहे. या इंजिनासाठी कंपनीने ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
पेट्रोलवरील सेलेरिओ कार ३.९० ते ५ लाख रुपये दरम्यान आहे. सीएनजीवरील सेलेरिओची किंमत सध्या ४.८५ लाख रुपये आहे. ही कार सर्वप्रथम फेब्रुवारी २०१४ मध्ये तयार करण्यात आली. आतापर्यंत तिच्या ९५ हजार वाहनांची विक्री झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा