केवळ संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या मारुती सुझुकीच्या ‘सिआझ’ सेदानची ६ हजार ग्राहकांनी नोंदणी केली आहे. कंपनीच्या सध्याच्या एसएक्स४ची जागा घेणारे हे वाहन यंदाच्या दसऱ्यापासूनच दालनांमध्ये उपलब्ध होणार आहे. ताफ्यात १३ प्रकारची वाहने असलेल्या मारुती सुझुकीने सिआझ या नवीन सी श्रेणीतील प्रवासी वाहनाची नोंदणी नुकतीच सुरू केली आहे. आतापर्यंत ६ हजार जणांनी उत्सुकता दाखविल्याचे कळते. कंपनीने २१ हजार रुपये स्वीकारत सध्या या वाहनाची नोंदणी सुरू केली आहे. चालविल्यानंतर हे वाहन पसंत न आल्यास रक्कम परत देण्याची तरतूदही यात आहे. स्पर्धेत कंपनीचे हे वाहन होंडाच्या सिटी व ह्य़ुंदाईच्या वेर्नाला टक्कर देईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki india opens bookings for ciaz