भारतीय वाहन उद्योगावरील कमी विक्रीचे मळभ कायम असतानाही सण समारंभाच्या निमित्ताने खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी देशातील पहिल्या क्रमांकाच्या मारुती सुझुकीने बुधवारी ‘स्टिन्ग्रे’ हे ‘कॉम्पॅक’ प्रवासी वाहन नवी दिल्लीत सादर केले. या श्रेणीतील कंपनीचे हे नववे वाहन आहे. पसंतीच्या ‘व्हॅगन आर’च्या तोडीचे हे वाहन असून तिची किंमत (व्हॅगन आरपेक्षा २० हजार रुपयांनी अधिक) ४.१० ते ४.६७ लाख रुपये दरम्यान आहे. कंपनीने डिसेंबर १९९९ पासून आतापर्यंत १३ लाख व्हॅगन आर विकल्या आहेत. नव्या ‘स्टिन्ग्रे’ मध्ये ९९८ सीसी पेट्रोल इंजिन असून ती तीन विविध प्रकारात आहे. जुलैमध्ये सलग नवव्या महिन्यात वाहन उद्योगाने घसरण नोंदविली असताना मारुतीची वाहन विक्री ११ टक्क्यांनी उंचावली होती.

Story img Loader