देशातील सर्वात मोठय़ा वाहन कंपनी मारुती सुझुकीने तिच्या लोकप्रिय अल्टो८०० व अल्टो के१० माघारी बोलाविल्या आहेत. स्वस्त श्रेणीत मोडणाऱ्या ३३,०९८ कारच्या दरवाज्यामधील लॅचमध्ये दोष आढळून आला आहे. ८ डिसेंबर २०१४ ते १८ फेब्रुवारी २०१५ दरम्यान तयार केलेल्या या कार आहेत. यामध्ये अल्टो८०० या १९,७८० तर अल्टो के१० या १३,३१८ कार आहेत. उजव्या बाजुचे समोर व मागचे अशा दोन्ही दरवाज्यांच्या लॅचमध्ये दोष असल्याने ही वाहने माघारी बोलावण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मारुती सुझुकीने डिसेंबर २०१४ मध्ये तिची नवी सिआझ ही प्रिमियम सेदान श्रेणीतील ३,७९६ कारही सदोष क्लचमुळे माघारी बोलाविली होती.

Story img Loader