नव्या वर्षांपासून मारुती, टोयोटाची वाहने महाग झाली असतानाच मर्सिडिझ बेन्झ या आलिशान कारच्या किंमतीही येत्या पंधरवडय़ापासून तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, रुपया-युरो चलनातील अस्थिरता, चढे व्याजदर यामुळे कंपनीने सर्व प्रकारच्या वाहनांच्या किंमती १४ जानेवारीपासून एक ते तीन टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यानुसार बी-क्लास प्रकारातील वाहने एक टक्क्यापर्यंत, सी आणि ई-क्लास प्रकारातील वाहने दीड टक्क्यापर्यंत तर एस-क्लास प्रकारातील (सर्व सेदान) वाहने तीन टक्क्यांपर्यंत अधिक किंमतीने यापुढे खरेदी करावी लागतील.
आलिशान आणि जर्मनीच्याच ऑडी कंपनीनेही गेल्या महिन्यात नव्या वर्षांपासून वाहनांच्या वाढत्या किंमती लागू केल्या जातील, असे म्हटले होते. तर मारुती, टोयोटा, होन्डा, ह्युंंदाई, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रसारख्या अन्य कंपन्यांचीही दरवाढ नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी लागू झाली आहे. मारुतीची सर्व वाहने १ जानेवारीपासून २० हजार रुपयांनी (दोन टक्क्यापर्यंत) वधारली आहेत. तर टोयोटानेही एक ते दोन टक्के अधिक किंमत जारी केली आहे. फोक्सव्ॉगन, शेव्‍‌र्हले ब्रॅण्ड असलेली जनरल मोटर्स यांनीही त्यांच्या वाहनांच्या किंमती जानेवारीपासून एक ते तीन टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा