महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील दिग्गजांना हेरून सन्मानित करण्याच्या मॅक्सेल फाउंडेशनकडून आयोजित पुरस्कार सोहळ्याच्या यंदाच्या दुसऱ्या वर्षीचे मानकरी घोषित करण्यात आले आहेत. मॅक्सेल जीवनगौरव पुरस्कारासाठी प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, मनोरमा इन्फोसोल्युशन्सच्या अध्यक्षा अश्विनी दानीगोंड, गद्रे मरिन एक्स्पोर्ट्सचे प्रवर्तक दीपक गद्रे, यूएस एरोटीम, ओहायओचे मुख्य कार्याधिकारी आणि अध्यक्ष सुहास काकडे, मर्सिडिझ बेन्झ इंडियाचे संचालक सुहास कडलासकर आणि अलाहाबाद बँकेच्या अध्यक्षा व कार्यकारी संचालिका शुभलक्ष्मी पानसे हे या सोहळ्यातील अन्य पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. मॅक्सेल फाउंडेशनचा हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १२ मे २०१३ रोजी नरिमन पॉइंटस्थित एनसीपीएच्या जमशेद भाभा थिएटरमध्ये सायंकाळी सहा वाजता होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे यानिमित्ताने बीजभाषण होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा