अमेरिकास्थित मॅकग्रॉ हिल फायनान्शियल इन्क. या कंपनीने, स्टँडर्ड अॅण्ड पुअर्सच्या माध्यमातून मुंबईस्थित पतमानांकन संस्था ‘क्रिसिल’मध्ये असलेला आपला सध्याचा ५२.८ टक्के भांडवली हिस्सा हा ७५ टक्के पातळीपर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे. यासाठी सामान्य भागधारकांकडे असलेल्या १५७ लाख समभागांची रु. १९०० कोटी खर्च करून प्रति समभाग १,२१० रुपयांनी फेरखरेदी केली जाईल, असे मूळ प्रवर्तक अमेरिकी कंपनीद्वारे सोमवारी मुंबई शेअर बाजार (बीएसई)ला कळविण्यात आले.
‘क्रिसिल’च्या बीएसईवरील सरलेल्या शुक्रवारचा बंद भाव रु. ९३८.९५ च्या तुलनेत मॅकग्रॉ हिलने ‘ओपन ऑफर’साठी निश्चित केलेला भाव २० टक्क्यांहून अधिक अधिमूल्य देणारा आहे. परंतु सोमवारी बाजारात या ‘ओपन ऑफर’ची वार्ता पसरल्याने क्रिसिलच्या समभागांच्या खरेदीला ऊत आला आणि २० टक्क्यांचे वरचे सर्किट लागून भाव १,१२६.६० वर पोहोचला. एकंदर बाजार नरमला असतानाही आठवडय़ाभरात क्रिसिलच्या भावात २२.२६ टक्क्यांची तर गेल्या महिनाभरात २६ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा