आयडीबीआय बँक आणि महिला विकास महामंडळ (माविम) यांच्यात बचत गटांना कर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला.
आयडीबीआय बँकेचे कार्यकारी संचालक एस. के. व्ही. श्रीनिवासन आणि एमएव्हीआयएमच्या व्यवस्थापकीय संचालिका कुसुम बाळसराफ यांनी स्वाक्षरी केली. यावेळी सर व्यवस्थापक एन कृष्णन्, एन. व्यंकटेश आणि आयडीबीआय आणि माविमचे इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील आयडीबीआय बँकांच्या विविध शाखांमध्ये या कराराचे पालन केले जाईल. माविमच्या आर्थिक उत्पादन उपक्रमांच्या माध्यमातून बचत गटांचे संगोपन करणे आदी बाबी या व्यवस्थापनाअंतर्गत केल्या जातील.
आयडीबीआय बँक-माविम सामंजस्य
महाराष्ट्रातील आयडीबीआय बँकांच्या विविध शाखांमध्ये या कराराचे पालन केले जाईल.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 23-12-2015 at 01:21 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memorandum of understanding between idbi bank ltd and mahila arthik vikas mahamandal