जर्मन बनावटीच्या आलिशान कार उत्पादक कंपनी मर्सिडीज बेन्झने भारतात २०१५ मध्ये विस्ताराची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. बुधवारी नवी दिल्लीत एका शानदार समारंभात कंपनीने कॅब्रियोलेट व सीएलएस २५० सीडीआय कुपे या ई-क्लास श्रेणीतील दोन आरामदायी कार सादर केल्या.
ग्राहकांना द्यायचे ते सर्वोत्तमच हे ब्रीद ध्यानात घेऊनच वाहने बाजारात आणल्याचे कंपनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी एबरहर्ड केन यांनी या वेळी स्पष्ट केले. एकटय़ा मार्चमध्ये तिसरे वाहन भारतीय बाजारपेठेत उतरवून कंपनीने अनोखा योग साधला आहे.
कार सादरीकरणप्रसंगी एबरहर्ड केन म्हणाले की, मर्सिडिज बेन्झ व आरामदायी हे समानार्थी शब्द आहेत. त्याला अनुसरूनच आम्ही ही नवी वाहने सादर करत आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशीच वाहने आम्ही आणली आहेत. त्यामुळे वाहन खरेदीदारांचा प्रवास हा आनंददायी व सुरक्षित असेल.
मर्सिडीज बेन्झने चालू वर्षांत देशातील १५ प्रमुख शहरांमध्ये दालने सुरू करण्याबरोबरच १५ नवीन वाहने सादर करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. यासाठी छोटय़ा शहरांमध्ये व्यवसाय विस्ताराचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. बुधवारी सादर केलेल्या दोन नव्या वाहनांबरोबरच देशात पहिल्यांदाच क्लाऊडवर आधारित मर्सिडीज बेन्झ अॅपदेखील कंपनीने तयार केले आहे. यामध्ये अमर्याद इंटरनेट वापरण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर रेडिओ, बातम्या, हवामानाची माहिती, फेसबुक यांचाही उपयोग करता येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा