भारतीय बाजारपेठ आलिशान मोटारी सर्वप्रथम आणणाऱ्या ‘मर्सडीज-बेंझ’ची देशातील वाहनांच्या उत्पादनाची क्षमता आताच्या दुप्पट म्हणजे वर्षांला २० हजार मोटारी इतकी वाढवण्यात येत आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून या क्षमतेने उत्पादन सुरू होऊ शकेल, अशी माहिती मर्सडीज-बेंझ (इंडिया)चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी इबेरहार्ड कर्न यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कर्न यांच्या हस्ते ‘मर्सिडीज’च्या नव्या ‘एस-क्लास ३५० सीडीआय’ या भारतात उत्पादित झालेल्या आलिशान मोटारीचे अनावरण करण्यात आले.
त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. पुण्याजवळील चाकण येथे मर्सडीज-बेंझ कंपनीचा वाहननिर्मिती प्रकल्प आहे.
तेथे या मोटारीची संपूर्ण निर्मिती सुरू करण्यात आली आहे. तिची भारतातील शोरूममधील किंमत १ कोटी ७ लाख इतकी आहे.
चाकण येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जे संशोधन केंद्र सुरू आहे, तेथील संशोधनाचा उपयोग मर्सडीजच्या जगभरातील उत्पादन प्रकल्पांमध्ये केला जात आहे, असेही कर्न यांनी सांगितले.
मर्सडीजतर्फे चाकण येथे तब्बल ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

जर्मन कंपनी मर्सिडिज बेन्झच्या पुण्यातील प्रकल्पात सादर करण्यात आलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या नव्या एस-क्लास ३५० सीडीआय प्रवासी कारसह मुख्य कार्यकारी अधिकारी एबरहार्ड केर्न वरिष्ठ उपाध्यक्ष पियुष अरोरा.
मर्सडीजचे ‘गो ग्रीन’
कंपनीतर्फे चाकण येथील प्रकल्पामध्ये सौरऊर्जा निर्मिती सुरू करण्यात आली आहे. तेथील वीजनिर्मितीची क्षमता दिवसाला ४०० युनिट इतकी आहे. त्याद्वारे कंपनीची विजेची २ टक्के गरज भागते. याचबरोबर प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या सर्व पाण्याचा पुनर्वापर केला जातो. या पर्यावरणपूरक गोष्टींचे प्रमाण हळूहळू वाढवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महानगरांपेक्षा इतरत्र जास्त विक्री
मर्सडीजच्या वाहनांची विक्री महानगरांमध्ये होत आहेच, पण त्यापेक्षाही जास्त विक्री इतर शहरांमध्ये व भागामध्ये होत असल्याचे कर्न यानी सांगितले. महानगरांमध्ये ४५ टक्के वाहनांची विक्री होते, तर इतर भागात हेच प्रमाण ५५ टक्के आहे. त्यामुळेच मर्सडीजतर्फे इतर भागात विक्री उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वर्षांअखेर ७० वितरक असतील, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader