भारतीय बाजारपेठ आलिशान मोटारी सर्वप्रथम आणणाऱ्या ‘मर्सडीज-बेंझ’ची देशातील वाहनांच्या उत्पादनाची क्षमता आताच्या दुप्पट म्हणजे वर्षांला २० हजार मोटारी इतकी वाढवण्यात येत आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून या क्षमतेने उत्पादन सुरू होऊ शकेल, अशी माहिती मर्सडीज-बेंझ (इंडिया)चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी इबेरहार्ड कर्न यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कर्न यांच्या हस्ते ‘मर्सिडीज’च्या नव्या ‘एस-क्लास ३५० सीडीआय’ या भारतात उत्पादित झालेल्या आलिशान मोटारीचे अनावरण करण्यात आले.
त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. पुण्याजवळील चाकण येथे मर्सडीज-बेंझ कंपनीचा वाहननिर्मिती प्रकल्प आहे.
तेथे या मोटारीची संपूर्ण निर्मिती सुरू करण्यात आली आहे. तिची भारतातील शोरूममधील किंमत १ कोटी ७ लाख इतकी आहे.
चाकण येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जे संशोधन केंद्र सुरू आहे, तेथील संशोधनाचा उपयोग मर्सडीजच्या जगभरातील उत्पादन प्रकल्पांमध्ये केला जात आहे, असेही कर्न यांनी सांगितले.
मर्सडीजतर्फे चाकण येथे तब्बल ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा