मायक्रोमॅक्स मोबाइल उत्पादक भारतीय कंपनीच्या अध्यक्षपदाचा संजय कपूर यांनी राजीनामा दिला आहे. भारती एअरटेल या मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीत यशस्वी कारकीर्द घडविणाऱ्या कपूर हे मायक्रोमॅक्समधून दोन वर्षांतच बाहेर पडले आहेत.
कपूर यांनी का राजीनामा दिला हे स्पष्ट होऊ शकले नाही; त्याचबरोबर त्यांच्या पुढील कारकीर्दीबाबतही कंपनी अनभिज्ञ आहे, असे मायक्रोमॅक्सच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले. भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेल्या कपूर यांनी जून २०१४ मध्ये मायक्रोमॅक्सची सूत्रे हाती घेतली होती. मायक्रोमॅक्सला जागतिक उत्पादन बनवण्यात त्यांचा वाटा होता. त्यांच्याच काळात मायक्रोमॅक्सने भारतीय बाजारपेठेत वरचष्मा राखला. भारतात फीचर फोनचा खप कमी होत असताना स्मार्टफोनचा खप वाढण्यामध्ये मायक्रोमॅक्सला संधी मिळाली होती. भारतीय बाजारपेठेत मोबाइल हँडसेट्सची विक्री जूनमध्ये सहा टक्क्य़ांनी कमी झाली. सॅमसंगचा या बाजारात २३ टक्के, मायक्रोमॅक्स १७ टक्के, इंटेक्स ११ टक्के, लावा ७ टक्के, लिनोवाचा ६ टक्के वाटा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा