नोकिया मोबाइलवर ताबा मिळविल्यानंतर मायक्रोसॉफ्टने आपला पहिला लुमिया ६३० हा फोन भारतात आणला आहे. हा बाजारात विंडोज ८.१ या नव्या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत पहिलाच मोबाइल असणार आहे. या फोनमध्ये इतर सर्व सुविधांबरोबरच आपल्या आरोग्यावर नजर ठेवणारे एक विशेष सन्सर आणि अ‍ॅपही देण्यात आले आहे.
आरोग्यावर नजर ठेवण्यासाठी सध्या बाजारात अनेक गॅजेट उपलब्ध आहेत. हे सर्व गॅजेट मोबाइलशी जोडले गेले की आपल्याला आपण दिवसभरात किती चाललो, आपण किती खायला हवे किंवा दिवसभर खाण्यामुळे किती कॅलेजरीज मिळाल्या आहेत, याबाबत माहिती मिळत असते. यासाठी आपल्याला हे गॅजेट वेगळे बाळगावे लागते. पण लुमिया ६३०मध्ये देण्यात आलेल्या सेन्सर मुळे आपण मोबाइल खिशात ठेवला की तो आपोआप आपल्या आरोग्यवर नजर ठेवून असतो. याच एक फिटनेस अ‍ॅप दिले आहे. या अ‍ॅपद्वारे आपल्याला आपला रिपोर्ट सातत्याने मिळत असतो. विंडोज ८.१ या नवीन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारा हा पहिलाच मोबाइल असून यामध्ये मेमरी कार्डच्या मदतीने आपण १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवू शकणार आहोत. बारा हजारपेक्षा कमी किंमतीच्या फोनमध्ये एवढी मेमरी देणारा हा एकमेव फोन असणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या या स्वत मोबाइलमुळे बाजारात पुन्हा एकदा स्वस्त फोनमध्ये युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.
फोनमध्ये देण्यात आलेला वर्ल्ड फ्लो की-बोर्ड हा सगळय़ात जलद असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनवरून जलद संदेश टाइप करून जागतिक विक्रम नोंदविण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले आहे. या शिवाय या फोनमध्ये ‘इंटलिजन्स’चा पर्याय देण्यात आला आहे. संदेश टाइप करताना आपल्याला विविध पर्याय सुचविले जातात. जसे की आपण सचिन हे नाव टाइप केले की खाली येणाऱ्या शब्दकोशात पुढचा शब्द तेंडुकर असा असतो. यामुळे संदेश टाइप करताना आपल्याला मदत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोटो ईही फ्लिकपार्टवर
फ्लिकपार्टच्या व्यासपीठावरून सादर करण्यात आलेल्या मोटो एक्स व जीनंतर आता मोटो ई मंगळवारी भारतात अवतरत आहे. ४.३ इंच स्क्रीन व ५ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा मोटो ई १२ हजार रुपयांच्या घरातला असेल.
अ‍ॅमेझोनवर कार्बन
कार्बन हा स्थानिक मोबाईल ब्रॅण्ड त्याचा टिटॅनियम हेक्झा स्मार्टफोन अ‍ॅमेझोन ई-कॉमर्स व्यासपीठावर मंगळवारीच घेऊन येत आहे. संकेतस्थळावरील खरेदी-विक्रीच्या स्पर्धेत उतरलेल्या अ‍ॅमेझॉनवरील हा फोन १६,९०० रुपयांना उपलब्ध होईल.

डय़ुएल सिम स्मार्टफोनची भारतातील किंमत रु. १२ हजाराच्या आत.
भारतीय स्मार्टफोन बाजारपेठ २०१३ मध्ये तिप्पटीने वाढून ४.४० कोटी नग.

स्मार्टफोन             हिस्सा
सॅमसन्ग               ३८ टक्के
माकक्रोमॅक्स        १६ टक्के
कार्बन                  १० टक्के
सोनी                    ५ टक्के
लावा                    ४.७ टक्के
(‘आयडीसी’च्या डिसेंबर २०१३ अखेर आकडेवारीनुसार)

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft launches first dual sim nokia lumia prices it at rs