‘इलेक्ट्रॉनिक मिल्क अ‍ॅनालायझर’च्या (एएमए) साहाय्याने दूधातील चरबीचा अंश, प्रथिनांचे प्रमाण, एसएनएफ, पाण्याचा अंश, लॅक्टोज इत्यादी चाचणी शक्य होणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या ‘कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ (सीजीएसआय) च्या कार्यालयामध्ये दूध भेसळीबाबतची चाचणी घेण्यात आली.
सीजीएसआय ग्राहक कल्याणाकरिता काम करणाऱ्या संस्था आणि समूह, महाविद्यालये आणि शालेय विद्यार्थ्यांच्या, एनएसएसच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक शिक्षणाकरिता आणि दूध खरेदी करण्याआधी त्याचा दर्जा पारखून घेऊ इच्छीणाऱ्या ग्राहकांकरिता या यंत्राचा उपयोग करु इच्छीते. ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या दूधाच्या दर्जाबद्दल ग्राहकांमध्ये जागरुकता आणि सतर्कता निर्माण व्हावी याकरिता सीजीएसआय महाराष्ट्र राज्यातील विविध या शहरांमध्ये ग्राहक संपर्क शिबिरांचे आयोजन केले जाते.

Story img Loader