डोंबिवली नागरी सहकारी बँकेने आपल्या ग्राहक सेवेतील ग्राहकांना मोबाईल बँकिंग प्रणालीद्वारे व्यापारी देणी देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेच्या अध्यक्षा नंदिनी कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम आकाराला आला आहे. अशाप्रकारची सुविधा देणारी डीएनएसबी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. या सुविधेमुळे रेल्वे आरक्षण, ऑनलाईन खरेदी, मोबाईल रिचार्ज, विमा हप्ता, तसेच वीज बील, मोबाईल बील भरणे ही व्यापारी तत्वावरील देणी भरणा करणे शक्य होणार आहे. या सुविधेचा डीएनएसबी बँकेच्या ग्राहकांनी लाभ घ्यावा. या सुविधा आतापर्यंत खासगी व राष्ट्रीयकृत बँकांमध्येच उपलब्ध होत्या, असे कुलकर्णी यांनी सांगितले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile banking from dombivali nagri bank