भारतात मोबाइल फोन वापरणाऱ्याची संख्या सातत्याने वाढतच आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही मोबाइल फोन आणि नेटवर्क मिळू लागले आहे. संयुक्त राष्ट्रांची जागतिक सीटीसी सांख्यिकी विश्लेषक ‘इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन’च्या अंदाजानुसार, भारतातील मोबाइलधारकांची संख्या येत्या काही काळात चीनपेक्षाही पुढे जाईल. ही संख्या अब्जावधीत जाईल. नवीन तंत्रज्ञानसह मोबाइलचा होणारा विस्तार हा नव्या जगाला एक नवा आत्मविश्वास आहे. चित्रपटाचे तिकीट खरेदी करण्यासाठी, बिल भरण्यासाठी, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी, पसे पाठवण्यासाठी याचा आता दररोज वापर होईल.
देशात जानेवारी २००८ मध्ये प्रथम मोबाइल बँकिंग सेवा आयसीआयसीआय या देशातील दुसऱ्या मोठय़ा खासगी बँकेने सुरू केली. बँकेने त्यावेळी ‘आयमोबाइल’ हे अप्लिकेशन सादर केले. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत आयसीआयसीआय बँकेने मोबाइलद्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये विविध वित्तीय सेवांचा समावेश केला असून, त्यामुळे देशात मोबाइलद्वारे होणाऱ्या आíथक व्यवहारांमध्ये (मोबाइल बँकिंग) आयसीआयसीआय बँक आघाडीवर आहे.
रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार आयसीआयसीआय बँकेच्या मोबाइल बँकिंग सेवेद्वारे २०१२-२०१३ मध्ये २,०३९ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहे. भारतात झालेल्या मोबाइल बँकिंगच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ३४% आहे.
आयसीआयसीआय बँकेने सुरुवातील एसएमएस स्वरुपात अलर्ट देण्यास सुरुवात केली. खातेदारांच्या खात्यातून काही व्यवहार झाल्यास त्याचा संदेश एसएमएसद्वारे ग्राहकाला मिळू लागले. त्यानंतर काही वर्षांत बँकेने काही सोप्या पद्धतीचे व्यवहार एसएमएसद्वारे सुरू केले. जसे की बॅलेन्स किती आहे ते पाहाणे, खात्यातील मागील पाच व्यवहार, बिल भरणे आणि पसे पाठवणे अशी सेवा सुरू केली.
आयमोबाइल सेवा सादर केल्यानंतर आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना बिल भरण्याची, विम्याचा हप्ता देण्याची, आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात तसे एनईएफटीद्वारे इतर बँकेच्या खात्यात पसे टाकण्याची आदी सेवा देणे सुरू केले. त्यानंतर खरेदीचे व्यवहारही मोबाइल बँकिंगद्वारे सुरू करण्यात आले.
चित्रपटाचे तिकीट बुकिंग, बस किंवा विमानाचे तिकीट बूक करणे, प्रीपेड मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज करणे, आणि जवळपास २० हून अधिक वस्तू (इलेक्ट्रॉनिक्स, कॉस्मेटिक्स, पुस्तके, फुले इत्यादी) खरेदीही करण्याची सोय उपलब्ध झाली. आता तर बँकेने स्थिर मुदत ठेवी आणि रिकिरग डिपॉझिटची सेवाही मोबाइलद्वारे सुरू केली आहे.
आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक राजीव सबरवाल याबाबत म्हणतात की, मोबाइल बँकिंगमध्ये झालेल्या क्रांतीमुळे मोबाइल फोन हा बँक व्यवहारांसाठी खूप मदतीचा ठरला आहे. कंपनीने आपली आयमोबाइल सेवा सुरू केल्यापासून आताच्या आधुनिक मोबाइल बँकिंग अप्लिकेशनच्या उपभोक्त्यांमध्ये दरवर्षी तब्बल १०० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वित्त वर्षांत व्यवहारांची संख्या आणि व्यवहारांचे मूल्यही ३०० टक्क्यांनी वाढले आहे. आम्हाला आशा आहे की, येत्या काळातही देशभरात इंटरनेटचे जाळे वाढत जाईल आणि त्यामुळे मोबाइल बँकिंग मोठय़ा प्रमाणात वाढेल.
नागरी भागातील खातेदारांना ही सेवा देण्यासह मोबाइल बँकिंगचा वापर जिथे बँकिंग पोहोचू शकली नाही, त्या दुर्गम भागातही होऊ शकतो. सभरवाल यांच्या मते, ही सेवा लोकप्रिय झाली कारण एकतर ही सेवा सुरक्षित आहे तसेच ही सुलभही आहे. त्याचप्रमाणे मोबाइलच्या जवळपास सर्वच (अँड्रॉइड, आयओएस आणि इतर) प्लॅटफॉर्मवरील ४,००० हून अधिक मॉडेल्सवर ही सेवा उपलब्ध आहे.
आयमोबाइल सेवा सुरू केल्यापासून ही सेवा वापरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत दरवर्षी दुपटीने वाढ होत आहे.
या सेवेचे महत्त्व एसबीआय, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकांना कळले असून, त्यातून बँकांना आपला महसूल वाढवता येऊ शकतो. मोबाइल बँकिंग सेवा आणखी सोपी, सुलभ आणि खात्रीशीर व्हावी यासाठी बँका आता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार करताना खातेदार आणि बँक असे दोघांनाही फायद्याचे ठरेल, अशी रचना करण्यात येत आहे.
मोबाईल बँकिंगचा वाढता वापर बँकांना सोशल साईटचे व्यासपीठ वापरण्यासही प्रोत्साहित करत आहे. विविध माहिती तंत्रज्ञानानंतर आता ग्राहकांमधील विविध पर्यायही जोपासू लागले आहेत. सरकारच्या आर्थिक सर्वसमावेशकतेच्या धोरणाचा अंगिकार आणि विस्तार करण्यासाठी बँकांनाही आता नव्या माध्यमाची गरज भासू लागली आहे. यातूनच खातेदारांना सुलभ मात्र माहिती तंत्रज्ञानाची कास धरण्यास भाग पाडले जाऊ लागले आहे.
मोबाइल बँकिंग : निधी व्यवस्थापनाची वाढती बाजारपेठ
भारतात मोबाइल फोन वापरणाऱ्याची संख्या सातत्याने वाढतच आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही मोबाइल फोन आणि नेटवर्क मिळू लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-10-2013 at 12:28 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile banking increasing market of funds management