‘न्यू हेवन’अंतर्गत माफक दरातील गृहनिर्मिती करणाऱ्या टाटा हाऊसिंगने दक्षिणेतील बंगळुरु येथेही हा प्रकल्प साकारला आहे. तुमकूर मार्गावरील हा प्रकल्प कंपनीचा पहिला पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. टू तसेच थ्रीबीएचके प्रकारातील १,८०० फ्लॅट ११ ते १५ मजली इमारतींमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती २० लाख रुपयांपासून पुढे आहेत. टाटा हाऊसिंगच्या ‘स्मार्ट व्हॅल्यू होम्स’ या उपकंपनीद्वारे ‘न्यू हेवन’ हे मोठय़ा आकारातील मात्र माफक दरातील गृहनिर्मिती करते. कंपनीने याअंतर्गत पहिला प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील बोईसर आणि वाशिंद येथे साकारला. २०१२ च्या सुरुवातीला गुजरातेतील अहमदाबाद येथेही ‘न्यू हेवन’ साकारण्यात आले.   

Story img Loader