देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील २२ बॅंकांना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सोमवारी ४९.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. केवायसी (नो युअर कस्टमर) नियमांचे उल्लंघन आणि काळ्या पैशांचे रुपांतर पांढऱयात करणे न रोखले गेल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. या बॅंकांमध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या बॅंकेसह एकूण २२ बॅंकांचा समावेश आहे.
कोब्रा पोस्ट या ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळाने स्टिंग ऑपरेशनच्या साह्याने या बॅंकांमधील गैरप्रकारांवर प्रकाशझोत टाकला होता. त्यावरून सिटी बॅंक, स्टॅंडर्ड चार्टर्ड यांच्यासह सात बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेने नोटीस बजावली.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कॅनरा बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, फेडरल बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक इत्यादी बॅंकांना प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. येस बॅंक, विजया बॅंक, धनलक्ष्मी बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बॅंकेचा २२ बॅंकांना ‘डंख’; ४९ कोटी रुपयांचा दंड
देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील २२ बॅंकांना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सोमवारी ४९.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
First published on: 15-07-2013 at 04:03 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money laundering rbi imposes fine of rs 49 5 crore on 22 banks