एरवी फोर्ब्सच्या यादीत सातत्याने वरचढ स्थान राखणाऱ्या मुकेश अंबानी यांच्याबरोबरच त्यांच्या रिलायन्स समूहाचा क्रमही कंपन्यांबाबत वरचा राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे समजले जाणाऱ्या फोर्ब्सच्या यादीत भारतातील ५६ कंपन्यांची नावे झळकली आहे.
मूळ यादीत जगभरातील २,००० बलाढय़ उद्योग समूह, कंपन्यांचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रिज १४२ व्या स्थानासह भारतात सर्वात आघाडीवर आहे.
कंपनीचे बाजारमूल्य ४२.९ अब्ज डॉलर मोजले गेले आहे. अन्य भारतीय कंपन्यांमध्ये बँक क्षेत्रातील स्टेट बँक, सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी व टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, अदानी एन्टरप्राईजेस, विप्रो, टाटा स्टील आदी समाविष्ट आहेत.
फोर्ब्समार्फत वार्षिक तत्त्वावर जारी केले जाणाऱ्या यंदाच्या यादीत सर्वाधिक ५७९ कंपन्या या एकटय़ा अमेरिकेतील आहेत.
तर चीनही आपल्या अधिकाधिक कंपन्यांसह या यादीत आघाडीवर आहे. आशियातीलच जपानचे स्थान तिसरे आहे. भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन अधिक कंपन्या यात राखल्या आहेत.
जागतिक २,००० कंपन्यांचे बाजारमूल्य यंदा ९ टक्क्य़ांनी वाढले असून विविध ६१ देशांमधील कंपन्यांचा एकित्रित महसूल ३९ लाख कोटी डॉलरचा आहे.c
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा