गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराच्या निर्देशांकात सुरू असलेली घसरण आठवड्याच्या अखेरच्या दिवशीही कायम राहिली. शेअर बाजार उघडताच निर्देशांकात तब्बल ३ हजार ९०.६२ अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९६६.१ अंकांची घसरण झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना व्हायरसचा जगभरात होत असलेला फैलाव या पडझडीला कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. करोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने घसरण सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा सुद्धा फटका शेअर बाजाराला बसल्याचं म्हटलं जात आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी घसरण झाल्यानं लोअर सर्किट लावण्यात आलं आहे.

शुक्रवारी सकाळी शेअर बाजार उघडताच त्यात ३ हजार ९०.६२ अंकांची घसरण होऊन तो २९६८७.५२ अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही ९६६.१ अकांची घसरण होऊन तो ८६२४.०४ अंकांवर पोहोचला. मार्च २०१८ नंतर गुरूवारी पहिल्यांदाच राष्ट्रीय शेअर बाजार १० हजाराच्या खाली आला होता. रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. तसंच सौदी अरेबिया आणि रशियात तेल दरावरुन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. ही सुद्धा शेअर बाजार पडण्यामागील दोन प्रमुख कारणे आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai share market down nifty falls jud