नवीन गुंतवणूकदारांनी त्यांची आर्थिक लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी अधिक चांगल्याप्रकारे गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. अशा गुंतवणूकदारांना मुदत ठेवी, सरकारी बचत योजना इत्यादींसारखे पर्यायही उपलब्ध असतात; मात्र त्यातून करबचत आणि काही विशिष्ट प्रमाणातच उत्पन्न वाढ होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय असून तो आता बाजारपेठेत प्रस्थापित होऊ  लागला आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणे खूपच आवश्यक आहे. तसेच म्युच्युअल फंडाविषयीचे गैरसमजही दूर करणे गरजेचे आहे.

१. व्यावसायिक व्यवस्थापन :

म्युच्युअल फंडांकरता जे पैसे जमा केले जातात त्याचे व्यवस्थापन मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडून (एएमसी) केले जाते.  एएमसीकडे मोठे कौशल्य आणि अनुभव असतो. त्यामुळे ते अर्थव्यवस्था, कंपन्या आणि बाजारपेठेचा नियमितपणे अभ्यास करत असतात.

परिणामी ते गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेऊ  शकतात. हे करणे छोटय़ा किरकोळ गुंतवणूकदाराला करणे शक्य नसते. विशेषकरून इतक्या मोठय़ा प्रमाणावरचे संशोधन करणे शक्य नसते.

धोक्याचे घटक : इंटरनेटमुळे किरकोळ गुंतवणूकदारांनासुद्धा योग्य माहिती मिळू शकते. परिणामी एखादी व्यक्ती आणि एएमसी यामधील ज्ञानाची ही दरी कमी होऊ  शकते.

प्रत्येक व्यक्तीकरता माहिती उपलब्ध असली तरीही एएमसीना अधिक लाभ होण्याची शक्यता असते.

कारण त्यांच्याकडे वेळ असतो आणि त्याचबरोबर माहिती गोळा करण्यासाठी, संकलन, संशोधन करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ असते तसेच ते विविध कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी बोलूही शकतात.

२.गुंतवणुकीचे पर्याय/लवचीकता :

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांना पुढील गोष्टींचा निर्णय तीन गोष्टींचा अभ्यास करून करण्याची गरज आहे :

धोका पत्करण्याची क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी आणि गुंतवणुकीचे लक्ष्य. या गोष्टींनुसार दिर्घकालीन, मध्यम आणि छोटय़ा कालावधीसाठी गुंतवणूक करणे आवश्यक असून त्यानुसार फंड घराणी विविध योजना (इक्विटी, डेट आणि हायब्रीड) तयार करतात. यामुळे वाढ, लाभ आणि असे पर्याय उपलब्ध होत असतात.

धोक्याचे घटक : विविध ४३ म्युच्युअल फंड कंपन्यांकडून ११,८५६ हून अधिक योजना कार्यान्वित आहेत. तसेच त्यातही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची सतत जाहिरात होत असते.

परिणामी गुंतवणूकदार यावेळी निर्णय घेऊ शकत नाही. गुंतवणुकीबाबत तो संभ्रमावस्थेत असतो.

जर गुंतवणूकदाराला धोका, कालावधी आणि लक्ष्याविषयी माहिती असेल तर बाजारपेठेतील माहितीनुसार किंवा व्यावसायिकांकडून सल्ला घेऊन योजनेची  निवड करणे सोपे जाते.

३. परवडणे आणि द्रव्यता :

कोणतीही व्यक्ती ही एकरकमी ५००-१,००० रुपयांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकते. तसेच एसआयपीच्या माध्यमातून रु. ५० किंवा १०० रुपये प्रति महिनासुध्दा गुंतवणूक करू शकतात.

म्युच्युअल फंडातील रक्कम सहज प्राप्त करणे शक्य होते.  लिक्विड फंडात गुंतवलेले पैसे हे २४ तासात प्राप्त करता येतात आणि अन्य फंडांतील पैसे हे तीन दिवसांत मिळविता येतात.

धोक्याचे घटक : ओपन एन्डेड स्कीममधील युनिट हे कोणत्याही वेळी मिळवले किंवा परत केले जाऊ शकतात. तर क्लोज्ड एन्डेड योजनांमधील गुंतवणूक ही केवळ योजना कालावधी करता असते व त्याचे पैसे परिपक्वतेच्या वेळीच मिळू शकतात.

गुंतवणूकदार हे क्लोज्ड एन्डेड फंडातून बाहेर पडण्यासाठी ते युनिट ‘सेकंडरी मार्केट’मध्ये विकू शकतात व त्यातून पैसे मिळवू शकतात.  कर बचत फंडाच्या बाबतीत पाहिल्यास करसवलत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना युनिट हे ‘लॉक इन पिरिएड’ संपेपर्यंत ठेवणे गरजेचे असते.

४. विविधता :

अगदी छोटी गुंतवणूक असल्याने है पैसे विविध प्रकारच्या उपकरणांमध्ये गुंतवले जातात जे छोटय़ा किरकोळ गुंतवणूकदारांकरता शक्य नसते.  म्युच्युअल फंड हे विविध समभाग क्षेत्रांमधील समभागांमध्ये गुंतवणूक करतात त्यामुळे धोका कमी होतो.

धोक्याचे घटक : ज्यावेळी फंड व्यवस्थापक अनेक ठिकाणी गुंतवणूक करतो, म्हणजेच अनेक रोख्यांमध्ये पैसे गुंतवतो त्यावेळी उच्च उत्पन्न देणाऱ्या एखाद्या समभागाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका असतो तर दुसरीकडे नुकसान कमी होण्याचाही धोका असतो.

विविध ठिकाणी गुंतवणूक केल्याने वेगळा धोका निर्माण होतो.  म्हणूनच गुंतवणूकदारांनी हे ठरवायचे असते की ते किती धोका पत्करू शकतात तसेच किती विविध ठिकाणी हे गुंतविणे गरजेचे असते.  गुंतवणूकदारांच्या स्तरावरसुध्दा त्यांनी अनेक प्रकारच्या विविध फंडांमध्ये गुंतवणूक करू नये.

५. पारदर्श, सुरक्षित आणि नियम बंधन :

म्युच्युअल फंडांचे कार्य हे पारदर्शक असते. कारण त्यांच्यावर सेबीसारख्या कठोर संस्थेचे नियमन असते.

६. करसवलत :

म्युच्युअल फंडांतून गुंतवणूक केल्यास समभाग आणि बिगर समभाग योजनांकरता करसवलत ही जितक्या कालावधीसाठी गुंतवले आहेत त्या कालावधीत मिळते.

७. कमी खर्चातील गुंतवणूक : 

म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक ही खर्चाच्या दृष्टिने पाहिल्यास कमी खर्चाची आहे. अधिकतर म्युच्युअल फंडामध्ये अनेकदा ‘एक्झिट लोड’ शुक्ल आकारले जाते. विशेषकरून विशिष्ट कालावधीच्या आधी पैसे काढून घेतले तर हा खर्च असतो.  त्याचबरोबर एएमसी शुल्क म्हणून मालमत्ता व्यवस्थापन शुल्क आकारले जाते. ते खर्चाच्या गुणोत्तरानुसार असते.

धोक्याचे घटक : यामध्ये नवीन  कमी खर्चाचा पर्याय म्हणजे ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ (एळा२) सुध्दा आता उपलब्ध झाले आहेत. ईटीएफ हे ‘बेंचमार्क इंडेक्स’नुसार काम करतात व त्याच सिक्युरिटीजमध्ये निर्देशांकानुसारच गुंतविले जातात. अशा ‘पॅसिव्ह फंडामध्ये निधी व्यवस्थापकाच्या कौशल्यांची गरज उरत नाही म्हणून या फंडांचे शुल्क खूपच कमी असते.

८. योजनेच्या कार्यक्षमतेचा आढावा घेणे :

कार्यक्षमतेचा आढावा हा ‘बेंचमार्क’नुसार जाणून घेऊन सरासरी उत्पन्नानुसार जाणून घेणे गरजेचे आहे.  योग्य बेंचमार्कची निवड करणे हे कार्यक्षमतेसाठी गरजेचे असते.  बाजारपेठेच्या विविध चRांनुसार टप्प्या टप्प्याने तुलना करणे आवश्यक आहे. कारण यामुळे अधिक सुस्पष्ट प्रतिमा मिळून निर्णय घेणे सोपे जाते.

लेखक एचडीएफसी सिक्युरिटीजचे किरकोळ संशोधन विभागाचे प्रमुख आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutual funds investment
Show comments