भांडवली बाजारातील अस्थिर वातावरणामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या गेल्या आर्थिक वर्षांत ३६ लाखांनी कमी झाली आहे. सलग चौथ्या वर्षांपासून यात सातत्याने घसरण होत असून या उद्योगाने नवे १५ लाख गुंतवणूकदारही गमावले आहेत.
गेल्या आर्थिक वर्षांत सेन्सेक्समध्ये ८ टक्क्यांची भर पडली होती.
भांडवली बाजार नियामक सेबीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, विविध ४४ कंपन्यांच्या अनेक म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूकदारांची संख्या मार्च २०१३ अखेर ४.२८ कोटी झाली आहे; ती २०११-१२ मध्ये ४.६४ कोटी होती. वर्षभरात कमी झालेल्या मुच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या ३६.२३ लाख आहे.
गेल्या चार वर्षांत म्युच्युअल फंड उद्योगाने ५५ लाखांहून अधिक गुंतवणूकदार गमावले आहेत. २००८-०९ मध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकदार ४.७५ कोटी होते. पुढील वर्षांत त्यात ३.६६ लाखांची भर पडल्याने एकूण गुंतवणूकदारांची संख्या ४.८ कोटी झाली होती.
मार्च २०१३ अखेर म्युच्युअल फंडांच्या १,२९४ योजना होत्या. पैकी ६६ टक्के योजना या इन्कम/ डेट फंडाशी निगडित होत्या, तर उर्वरित योजना या ग्रोथ/ इक्विटीसंबंधित होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा