‘एक लाखाची कार’, असा गाजावाजा करत सादर झालेल्या नॅनोचे नावीन्य संपले असले तरी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नॅनोला नवे रूप देण्याचा टाटा मोटर्सचा निर्धार आहे. अॅटोमॅटिक गीअर शिफ्ट स्वरूपात नॅनो सादर केली जाणार असून खपातील घसरणीमुळे या गाडीचे उत्पादनच बंद करण्याच्या अफवांचा टाटा मोटर्सने स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.
टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या स्वप्नातील ही कार बऱ्याच गाजावाजानंतर २००९ मध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल झाली. मात्र, त्यानंतर सातत्याने नॅनोचा खपाचा आलेख उतरता राहिला आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये नॅनो ट्विस्ट या नव्या स्वरूपात सादर झाली. मात्र, तरीही गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत फक्त ११ हजार ३३३ नॅनो कारची विक्री झाली. या पाश्र्वभूमीवर नॅनोचे उत्पादनच बंद करण्याचे घाटत असल्याच्या अफवा उठल्या होत्या. मात्र, टाटा मोटर्सने या अफवांचा इन्कार करत नॅनो आणखी आकर्षक स्वरूपात सादर केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. नव्या रूपातील नॅनोमध्ये आणखी आकर्षक सुविधाही असतील, असेही टाटा मोटर्सतर्फे सांगण्यात आले.
नॅनोचे नवनावीन्य
‘एक लाखाची कार’, असा गाजावाजा करत सादर झालेल्या नॅनोचे नावीन्य संपले असले तरी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नॅनोला नवे रूप देण्याचा टाटा मोटर्सचा निर्धार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-01-2015 at 01:09 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nano new initiatives to push sales