प्रश्न : ज्या  डिमॅट खात्यात खातेदारांनी पॅन दिलेला नाही ती सर्व खाती एक जानेवारी २००७ पासून  गोठवण्यात (फ्रीझ) आली आहेत, हे खरे?
उत्तर : अशी डिमॅट खाती पूर्णत: फ्रीझ करण्यात आली आहेत.
प्रश्न : पण ही डिपॉझिटरीजची मनमानी नाही का?
उत्तर : नाही. जानेवारी २००६ पासून सेबीने खातेदारांना पॅन कार्ड काढावे असे आवाहन केले.
प्रश्न : फ्रीझ केलेली खाती कधी सुरू होतील?
उत्तर : खातेदार ज्या दिवशी डीपीकडे जाऊन पॅन सादर करतील त्या दिवशी खाते पुन्हा सुरू होईल.
प्रश्न : विशिष्ट कालावधीपर्यंत पॅन सादर केले नाही तर खात्यातील सर्व शेअर्स जप्त होतील का?
उत्तर : मुळीच नाही. शेअर्स अगदी सुरक्षित असतील व त्यावर खातेदाराचीच मालकी असेल.
प्रश्न : बोनस म्हणून मिळालेले शेअर्स तरी विकता येतील का?
उत्तर : नाही. डेबिटसाठी खाते फ्रीझ असल्याने तसे करता येणार नाही.
प्रश्न : तीन जणांचे संयुत्त खाते असेल तर फत्त पहिल्या खातेदाराने पॅन नंबर दिले तर चालेल का?
उत्तर : नाही. सर्व खातेदारांचा पॅन आवश्यक आहे.
प्रश्न : फ्रीझ असलेले खाते बंद करता येईल का?
उत्तर : नाही.
प्रश्न : मी १० वर्षांपूर्वी पॅन कार्ड घेतले आहे. दर वर्षी परतावा (रिटर्न) भरतो. पण पॅन मिळत नाही. तेव्हा भरलेल्या रिटर्नची कॉपी डीपीकडे सादर केल्यास माझे खाते पुन्हा सुरू होईल का?
उत्तर : नाही. सेबीची तशी परवानगी नाही.
प्रश्न : मग मी पुन्हा पॅन कार्ड घ्यावे का?
उत्तर : दुसरे (डुप्लिकेट) कार्ड मिळण्यासाठी अर्ज करावा. एक व्यक्ती एकाहून अधिक पॅन कार्ड घेऊ शकत नाही.
प्रश्न : डुप्लिकेट कार्ड मिळणे गुंतागुंतीचे आहे?
उत्तर : अजिबात नाही. एक छापील अर्ज भरून त्याबरोबर विहित फी भरल्यास सुलभतेने डुप्लिकेट पॅन कार्ड मिळते.
प्रश्न : खातेदार अज्ञान असेल तर पॅन कार्ड आवश्यक आहे का?
उत्तर : होय. अगदी पाळण्यातील मुलाच्या नावाचे डिमॅट खाते असेल तरी पॅन पाहिजे.
प्रश्न : पण एखाद्या खातेदाराची टॅक्स  लाएबिलिटी नसेल तर?
उत्तर : तरीही पॅन कार्ड घेऊन तो नंबर डीपीला देणे जरूरीचे आहे
प्रश्न : माझे डिमॅट खाते सुहास ब. कुळकर्णी या नावाने आहे. पण माझ्या पॅन कार्डावर सुहास कुळकर्णी असे नाव आहे. डीपी ते स्वीकारीत नाही. अशा वेळी मी काय करावे?
उत्तर : अशाप्रसंगी आपण काही अतिरित्त कागदपत्र सादर करावे जेणेकरून आपण तीच व्यत्ती असल्याचे सिद्ध होईल.
प्रश्न : तरीही डीपी सहकार्य करीत नसेल तर?
उत्तर : आपण संबंधित डिपॉझिटरीशी संपर्क करू शकता.
प्रश्न : पॅन मिळाले की दर वर्षी इन्कम टॅक्सचे रिटर्न भरलेच पाहिजे असा नियम आहे का?
उत्तर : सध्या तरी पॅन कार्ड म्हणजे केंद्र सरकारच्या इन्कम टॅक्स विभागाने दिलेले ओळखपत्र इतकाच त्याचा अर्थ आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यामुळे पॅन कार्ड आहे पण ‘टॅक्स  लाएबिलिटी’ नसेल तर रिटर्न भरलेच पाहिजे असे नाही.
प्रश्न : माझे वैयत्तिक नावाचे पॅन कार्ड आहे. शिवाय मी आमच्या  एचयूएफ (Hindu Undivided Family) चा कर्ता आहे. तर HUF डिमॅट खात्यासाठी माझे वैयत्तिक पॅन कार्ड चालेल का?
उत्तर : नाही. HUF साठी वेगळे पॅन कार्ड घ्यावे लागेल.
पनवेलहून संतोष दीक्षित यानी विचारले आहे की परदेशी अर्थसंस्था जशा भारतात गुंतवणूक करतात तसे येथील संस्था परदेशात गुंतवणूक करू शकतात का? त्याचे उत्तर असे – सध्या सरसकट तशी परवानगी नाही. आपल्या देशातील मोठे शेअर दलालांचे परदेशात प्रातिनिधिक कार्यालय आहेत त्यांच्या मार्फतच हे व्यवहार काही ठराविक रकमेपर्यंतचेच करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा