दूरचित्रवाणी, संकेतस्थळद्वारे आघाडीचा माध्यम समूह म्हणून ओळखले जाणाऱ्या नेटकवर्क१८ वर ताबा मिळविल्याचे जाहीर करतानाच रिलायन्स इंडस्ट्रीजने ज्येष्ठ पदांवर फेरबदल घोषित केले आहेत. नेटवर्क १८चे संस्थापक व माजी मुख्य प्रवर्तक राघव बहल यांना अ-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
खासगी वित्तीय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी नेटवर्क १८ मीडिया अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेन्ट लिमिटेडवर स्वतंत्र संचालक म्हणून घेण्यात आले आहे. तर मॅकेन्झीचे वरिष्ठ सल्लागार आदिल झैनुलभाई हेही स्वतंत्र संचालकांच्या भूमिकेत असतील.
नेटवर्क १८ समूहातील इंग्रजी वृत्तवाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई यांनी दोनच दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. संपादकीय विभागांशी उभ्याने निरोप घेतल्याची त्यांची चित्रफीत सध्या सोशल नेटवर्क साइटवरून फिरते आहे. नेटवर्क १८वर अस्तित्व येताच रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी अर्थविषयक गुजराती वाहिनी सुरू केली.
नेटवर्क १८च्या संपूर्ण खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्याचे रिलायन्सने म्हटले आहे. समूहाच्या ‘इंडिपेन्डेन्ट मीडिया ट्रस्ट’च्या माध्यमातून हा व्यवहार झाला आहे. यामार्फत ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे रिलायन्सने मेमध्येच जाहीर केले होते. या माध्यमातून नेटवर्क १८ मीडिया अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेन्टसह तिची उपकंपनी टीव्ही १८ ब्रॉडकॉस्ट लिमिटेडवरही रिलायन्सने ताबा मिळविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा