नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने विकसित करण्यात आलेला साबण अनुस्पाने बाजारात आणला आहे. संत्रे, आवळा तसेच आरोग्यवर्धक अन्य पदार्थाचा यात समावेश करण्यात आला आहे. शंभर टक्के शाकाहारी अन्नपदार्थाचा यात अंश आहे. त्वचा मुलायम ठेवण्यात हे पदार्थ महत्त्वाचे ठरतात. ऑले वेरा, शाही चंदन, बदाम तेल, केसर, गुलाबजल अशा विविध अंशासह ते उपलब्ध आहेत.
कवाचीचे परफेक्ट ब्रिक पिझ्झा मेकर
अमेरिकेत प्रसिद्ध पिझ्झा मेकरचे तंत्रज्ञान कवाची ग्रुपने भारतात आणले आहे. कणकेचा पिझ्झा बेस व त्यावर आपल्याला आवडणारे टॉपिंग टोमॅटो, कांदा, मशरूम, मिरची इत्यादीचे तुकडे ठेवून ब्रिक पिझ्झा मेकरमध्ये ठेवायचे. यातील डोम शेपमुळे पिझ्झा क्रिस्पी बनतो. तो नीट भाजला जातो आणि मऊ पडत नाही. इटालीयन पिझ्झाप्रमाणे चव देणाऱ्या पिझ्झा मशीनच्या उत्पादनाची मूळ किंमत ९ हजार रुपये आहे.
कॅसिओचे नवे घडय़ाळ
कॅसिओ कंपनीने दणकट धातूपासून तयार केलेले मनगटी घडय़ाळ एरा २०० या श्रेणीत दाखल केले आहे. वाहनांमधील वेग दर्शकाच्या रचनेप्रमाणे हे घडय़ाळ आहे. दिशादर्शकासह स्टॉपवॉच, स्लिप टाईम मोड याही सुविधा यात आहेत. डिजिटल आणि अ‍ॅनालॉग अशा दोन्ही प्रकारात ते सूचित होते. वल्ज टाईम, डेली अलार्म, ऑटो कॅलेन्डर आदी सुविधाही यात आहेत. या घडय़ाळाची किंमत १२,९९५ ते १४,९९५ रुपये अशी आहे.
टाटा स्वच्छचे क्रिस्टेला प्लस
स्वस्तातील जलशुद्धीकरण यंत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाटा स्वच्छने नवे क्रिस्टेला प्लस हे उत्पादन सादर केले आहेत. ओरखडे न पडणारी बॉडी, वेगवान अल्ट्रा लाईट कार्टेज ही नव्या उत्पादनाची वैशिष्टय़े आहेत. हे उपकरण १,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यातील बल्ब हा आधुनिक नॅनो सिल्वर तंत्रज्ञानावर आधारित आहे. अधिक प्रमाणात जलशुद्धीकरण नव्या क्रिस्टेला प्लसद्वारे शक्य होते, असा दावा करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरेदीचे स्वातंत्र्य
लूपधारकांसाठी मोबाईलवर देशभक्तीपर गाणे
मुंबई परिमंडळात मोबाईल सेवा देणाऱ्या लूप मोबाईल (आधीची बीपीएल) कंपनीने स्वातंत्र्यदिनानिमित्त तिच्या ग्राहकांना देशभक्तीपर गाणे ऐकण्याची संधी दिली आहे. यासाठी ग्राहकांनी विशिष्ट क्रमांकावर आपल्याला हव्या त्या गाण्याची नोंद करावयाची आहे. याअंतर्गत एमपी३ डाऊनलोड तसेच या विषयाला वाहिलेले काही पोर्टल, गाणे यांचा आस्वाद घेता येणार आहे.
कुमार अर्बन डेव्हलपर्सची गृहखरेदीवरही सवलत
देशाचा ६६ वा स्वातंत्र्यदिन व कंपनीचा ४८ वा वर्धापन दिन यांचा सुवर्णयोग साधून आघाडीच्या कुमार अर्बन डेव्हलपर्स या महाराष्ट्रस्थित विकासक कंपनीने सवलतीत गृह खरेदी उपलब्ध करून दिली आहे. यानुसार १५ ऑगस्टपासून होणाऱ्या खरेदी व्यवहारात प्रति चौरस फूट ४८० रुपयांची सूट मिळेल. कंपनीच्या  निर्वाणा हिल्स, लक्ष्मी विलास, कुमार कृती, कुमार सिटी या प्रकल्पांसाठी ही सवलत महिनाभराच्या कालावधीत असेल.
व्हिडिओकॉनची स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत इंटरनेट डाटा सेवा
स्वातंत्र्यदिनानिमित्त व्हिडिओकॉन मोबाईल सव्‍‌र्हिसेसने मोफत जीपीआरएस तसेच सीआरबीटीवर मोफत गाणे डाऊनलोड करण्याची सुविधा तिच्या मोबाईलधारकांना दिली आहे. १५ ऑगस्टला तर दिवसभर मोफत मोबाईल इंटरनेट डाटा युजेस उपलब्ध करून दिला आहे. या व्यतिरिक्त २२ रुपयांच्या जीपीआरएस पॅकसाठी रिचार्जिगही देऊ केले आहे. याअंतर्गत ग्राहकांना २५ टक्के सवलत मिळणार आहे.
क्रोमा दालनामध्ये सवलतीत महिनाभर उपकरण संधी
टाटा समूहाच्या विद्युत उपकरण विक्री दालन असलेल्या क्रोमामध्ये यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने महिन्याभरासाठी सवलतीच्या दरातील उत्पादन विक्री सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोबाईल, कॅमेरा, कॉम्प्युटर, स्वयंपाक घरातील विविध उपकरणे आदींचा समावेश आहे. विविध ६,००० उत्पादनांवर ही सवलत लागू आहे. विशिष्ट बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना १५,००० रुपयांपेक्षा अधिकच्या खरेदीवर कॅश बॅक ऑफरही आहे.

सवलतींची पौर्णिमा
दि कोको ट्रीजचे चॉकलेट
दि कोको ट्रीज या सिंगापूरस्थित चॉकलेट बुटिक स्टोअरने विविध चवीतील चॉकलेट यंदाच्या रक्षा बंधनाच्या निमित्ताने उपलब्ध केले आहेत. विविध ४० प्रकारचे निरनिराळ्या चव आणि आकारातील हे चॉकलेट आकर्षित वेष्टनासहित आहेत. मेर्सी, हेर्शेज किसेस आणि मॉल्टेसर्स हे त्यातील मुख्य प्रकार आहेत. कंपनीच्या मुंबई, पुणे, दिल्ली आणि गोवा येथील निवडक दालनांमध्ये ते उपलब्ध आहे.
ब्ल्यू डार्टची राखी पोहोच सेवा
दक्षिण आशियातील आघाडीच्या माल हाताळणी सेवा पुरवठादार ब्ल्यू डार्टने यंदाच्या राखी पौर्णिमेसाठी ठिकठिकाणी राखी पाठविण्यासाठी राखी एक्स्प्रेस सेवा सुरू केली आहे. कंपनीच्या विविध ५०० हून अधिक केंद्राद्वारे ती सुरू आहे. याअंतर्गत ५०० ग्रॅमपर्यंत वजनाचे कुरिअर भारतात कुठेही २०० रुपयांमध्ये पाठविण्याची सोय आहे. याचबरोबर बहिणी त्यांच्या भावांसाठी मोफत घडय़ाळही जिंकू शकतील. ही सवलत ३१ ऑगस्टपर्यंत आहे.
पताचीची आकर्षक चॉकलेट
पताची या गोड खाद्यपदार्थ निर्मिती श्रेत्रातील कंपनीने यंदाच्या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने चॉकलेटमधील नवे स्वाद तयार केले आहेत. सुशोभित थाळीमध्ये विविध आकार आणि चवीतील हे चॉकलेट छोटय़ाशा गणपतीच्या मुर्तीसह सजविण्यात आले आहेत. हे चॉकलेट चांदी तसेच सोन्याचा वर्ख असलेल्या वेष्टनात आहेत. त्यांच्या किंमती १,००० रुपयांपासून पुढे आहेत.
ओरिफ्लेमचा सुवासिक नजराणा
ओरिफ्लेम इंडियाने बहिण तसेच भावालाही राखी पौर्णिमेचे क्षण अधिक सुगंधित करण्याची संधी देऊ केली आहे. कंपनीने खास फ्रॅग्रन्सची नवी श्रेणी यानिमित्ताने बाजारात आणली आहे. यामध्ये स्त्री वर्गासाठी प्रेट्टी स्वॅन इयू दे व पुरुषांसाठी एस्पिओन्ज इयू दे हे दोन प्रकार सादर केले आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे १,६९० व १,८९० रुपये आहे.