टीबीझेडची सुवर्ण घडय़ाळे
दीडशे वर्षांची परंपरा असलेली सराफ पेढी टीबीझेड- द ओरिजिनलने स्त्री-पुरुषांसाठी उंची मनगटी घडय़ाळांची श्रेणी सादर केली आहे. कालातीत स्विस परंपरेची घडणी असलेली ही घडय़ाळे ही १८ कॅरेट सोन्यामध्ये आणि सॅफायर क्रिस्टल ग्लाससह प्रस्तुत झाली असून, त्यांची रचना पाण्याला प्रतिबंध करणारी असून पाच वर्षांच्या वॉरंटीसह उपलब्ध झाली आहेत. कोणत्याही खास प्रसंगी तसेच दैनंदिन वापरासाठीही उपयुक्त ही घडय़ाळे देशभरातील निवडक १० शहरातील टीबीझेडच्या १६ शोरूम्समध्ये विक्रीसाठी असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिंतीचा ‘क्राफ्ट’ कायापालट
प्रिझम सीमेंट लि.चे रंगतदार फरशांच्या निर्मितीतील एक अंग असलेल्या एच अ‍ॅण्ड आर जॉन्सन (इंडिया)ने आता भिंतींचा कायापालट करणाऱ्या नव्या व्यवसायात प्रवेश करताना सिरॅमिक पॅनल्सचे ‘जॉन्सन क्राफ्ट’ नावाची उत्पादनश्रेणी प्रस्तुत केली आहे. महाराष्ट्रातील उत्पादन प्रकल्पात घडविलेली ही पॅनल्स ८० सेमी ७ ४० सेमी अशा बडय़ा आकारमानात उपलब्ध झाली असून, ती दिवाणखाना, न्हाणीघराच्या भिंतीवर वापरात येऊ शकतील. प्रगत सिरॅमिक तंत्रज्ञान आणि कल्पक रचनांचा संगम असलेली ही पॅनल्स घराच्या अंतर्गत सजावटीला नवी उंची प्रदान करतील. जॉन्सन क्राफ्ट सध्या चार वेगवेगळ्या प्रकारात जसे डेकोरेटिव्ह वूडन, मॉडय़ुलर मार्बल, रॉक प्लेट्स आणि विशेष वॉलपेपर इफेक्ट्स या स्वरूपात उपलब्ध झाली असून, ती मुंबईसह पश्चिम भारतातील जॉन्सन टाइल्सच्या विक्रेत्यांकडे पाहता-अनुभवता येतील.

गुडघेदुखीसाठी सौना थेरपी
वाढणारे वय, योग्य व्यायामाचा अभाव आणि तणावपूर्ण जीवन यामुळे गुडघेदुखीचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून कवाची ग्रुपतर्फे पायाला शेक घेण्यासाठी ‘फूट सौना’ बाजारात आला आहे. यासोबतच स्टीम चेंबर देण्यात येतो. त्यामध्ये कडूनिंब, निरगुडी इत्यादी औषध पाने, त्यांचा रस घालून शेक घेता येतो. फूट सौनामध्ये पाय ठेवून खुर्चीवर बसून आरामात पायाला शेक घेण्याची व्यवस्था आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त अशा या उत्पादनाची मूळ किंमत ७ हजार रुपये असून सुरुवातीला सवलतीचा दर ३,९९० रुपयात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हायपरसिटीमध्ये ‘बॅक टू स्कूल’ कलेक्शन
उन्हाळी सुट्टय़ा संपून शाळा पुन्हा सुरू होत आहेत. आपल्या आवडत्या कार्टून व्यक्तिरेखांनी अगदी शाळेतही सोबत करावी यापेक्षा लहानग्यांना भावणारी दुसरी गोष्ट कोणती असू शकेल. ‘हायपरसिटी’ विक्री दालनाने नेमकी हीच गंमत साधत विविध कार्टून व्यक्तिरेखांच्या छबी असलेल्या छोटय़ांसाठी स्कूल बॅग्ज, लंच बॉक्सेस, वॉटर बॉटल्स आणि शाळोपयोगी साहित्य व स्टेशनरीची ‘बॅक टू स्कूल’ उत्पादनश्रेणी प्रस्तुत केली आहे. उल्लेखनीय म्हणजे ही उत्पादने १० ते २० टक्के विशेष सवलतीसह मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध झाली आहेत.

शाकाहारी स्निकर्स
मार्स इंटरनॅशनल इंडियाची लोकप्रिय चॉकलेट नाममुद्रा ‘स्निकर्स’ आता देशातील शाकाहार पसंत करणाऱ्या मंडळींनाही चाखता येईल. ‘अंडेरहित’ स्निकर्सचे शाकाहारी रूप २५ ग्रॅम आणि ५४ ग्रॅम या पॅक्समध्ये अनुक्रमे १५ रु. आणि ३० रुपयांना सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

लॅक्मेचे फेसवॉश, स्क्रब आणि मास्क
विख्यात सौंदर्य उत्पादन ब्रॅण्ड असलेल्या लॅक्मेने क्लिन-अप नरिशिंग ग्लो ही नवी श्रेणी सादर केली आहे. फेसवॉश, स्क्रब आणि मास्क अशा तीन उत्पादनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. चेहऱ्यावरील मळ काढून टाकणे, मृत पेशींचा थर नाहीसा करणे आणि त्वचेला पोषण देणे ही कार्ये यामार्फत होतात. भारतीय सौंदर्यप्रसाधन व आरोग्य क्षेत्रात स्वत:चा पुनशरेध घेण्यास सज्ज झालेल्या लॅक्मेने क्लिन-अप नरिशिंग ग्लो श्रेणी २९९ रुपयांमध्ये, फेसवॉश : २५ ग्रॅम : ४० रुपये, स्क्रब : ५० ग्रॅम : ९९ रुपये, मास्क : ५० ग्रॅम : ९९ रुपये किंमतीत देशातील निवडक शहरांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

ब्ल्युस्टोन.कॉमवर महिला कर्मचाऱ्यांसाठी दागिने
देशातील प्रीमियर ऑनलाइन ज्वेलरी स्टोअर असलेल्या ब्ल्युस्टोन.कॉमने दी बोर्डरूम ग्लॅम नावाने हिरेजडित दागिन्यांची मालिका सादर केली आहे. महिला कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनात त्यांचे कार्यालय, बैठका अशा निमित्ताने दागिने घालण्याची संधी यामार्फत उपलब्ध करून दिली आहे. १८ कॅरेट सोने तसेच रुबी, ब्ल्यू टोपाझ, स्रिटाईन आणि अक्वामरिन रत्नांपासून हे दागिने तयार करण्यात आले आहेत. या दागिन्यांच्या किमती ९,००० रुपयांपासून पुढे आहेत.

हिमालयाची लहानग्यांसाठी त्वचानिगा उत्पादने
हर्बलच्या जोडीने आरोग्यवर्धक उत्पादने सादर करणाऱ्या हिमालयाने लहान मुलांच्या नाजूक त्वचेचे अधिक संरक्षण करण्यासाठी तीन अनोखी उत्पादने सादर केली आहेत. उन्हाळ्यानंतर लगेचच येणाऱ्या मान्सूनमुळे होणाऱ्या हवेतील बदलाचा मुलांच्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ नयेत म्हणून साबण, श्ॉम्पू आणि पावडर ही नव्या अर्कासह उपलब्ध करून देण्यात आली आहेत. खसखस, नैसर्गिक झिंक, सूर्यफूल, तसेच कॅस्टर ऑइल यांचा यात समावेश करण्यात आला आहे. साबण ३५ ते ५५ रुपये, श्ॉम्पू ७७ ते १४९ रुपये व पावडर २५ ते १२५ रुपयां दरम्यान आहे.

लिबर्टीची पावसाळी पादत्राणे
ऐन पावसात चालणे सुकर व्हावे यावर भर देताना पादत्राणे निर्मितीतील लिबर्टीने थोरामोठय़ांपर्यंत नवी उत्पादने सादर केली आहेत. लिबर्टी ही चामडय़ाची पादत्राणे निर्मितीतील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. महिला तसेच पुरुषांसाठी कूलर्स हे सॅन्डल, तर स्त्रीवर्गासाठी खास दिवा तसेच ग्लायडर्स ही हलकी व रंगबिरंगी उत्पादने सादर केली आहेत. मुलांसाठी फूटफन नावाने विविध पादत्राणे सादर करण्यात आली आहेत. या उत्पादनांच्या किमती १०० रुपयांपासून १,००० रुपयांपर्यंत आहेत.f

Web Title: New article arrival in market