‘गॅट्सबी’चे पदार्पण
जपानच्या मँडोम कॉर्पोरेशन या स्त्री-पुरुष सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मात्या कंपनीचे भारताच्या बाजारपेठेत ‘गॅट्सबी’ या उत्पादन नाममुद्रेद्वारे पदार्पण झाले आहे. गॅट्सबी हे त्यांचे लोकप्रिय हेअर-स्टाइलिंग उत्पादन आहे. पुरुषांच्या केस-सौंदर्याच्या क्षेत्रात अल्पावधीत अव्वल स्थान प्राप्त करण्याचे आक्रमक नियोजन कंपनीने आखले असून, अभिनेता वरुण धवनला तिने या उत्पादनासाठी सदिच्छादूत म्हणून करारबद्ध केले आहे.
सौंदर्य बाजारपेठेत ‘ईमू तेला’चा शिरकाव
गेली अनेक वर्षे ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोपीय देशात निर्यात होत असलेले, त्वचा, नखे आणि केसांच्या आरोग्य व सौंदर्याच्या दृष्टीने गुणकारी ‘टॉलबर्ड’च्या इमू तेलाचे लाभ आता भारतीय ग्राहकांनाही उपभोगता येतील. रिफाइण्ड ईएमयू उत्पादनांच्या देशातील पहिल्या श्रेणीचे अलीकडेच टीव्हीतारका सुमोना चक्रवर्ती हिच्या हस्ते अनावरण झाले. ईमू तेलाची ही शृंखला १०० मि.लि.साठी रु. ४२५ ते रु. ४९५ किमतीत उपलब्ध झाली असून, या संपूर्ण शृंखलेविषयीचा तपशील http://www.tallbirdemu.com या संकेतस्थळावरही पाहता येईल.
वेस्टसाइडतर्फे बॉडी स्क्रब
क्षीण, थकवा घालवून शरीराला ताजेतवाने स्वास्थ्य व ऊर्जा मिळवून देणारे कोकोनट अॅण्ड लाइम बॉडी स्क्रब प्रस्तुत झाले आहे. टाटा समूहाची किरकोळ विक्री-दालन शृंखला ‘वेस्टसाइड’मध्येच केवळ उपलब्ध असलेल्या या उत्पादनात नारळ आणि लिंबाचे त्वचेला तजेला व मुलायमपणा बहाल करणारे नैसर्गिक गुण आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे येथील वेस्टसाइड स्टोअरमध्ये ते उपलब्ध झाले आहे.
‘कार्बन-स्मार्ट’चा व्होडाफोनशी सहकार
मोबाइलचा ब्रॅण्ड कार्बनने आपले ‘टायटॅनियम एस-५’ आणि ‘स्मार्ट ए-१२’ या स्मार्ट हॅण्डसेट्ससाठी दूरसंचार सेवा व्होडाफोनशी विक्रीविषयी सामंजस्य केले आहे. या अतुलनीय वैशिष्टय़े असलेल्या हॅण्डसेट्सच्या ग्राहकांना व्होडाफोनकडून आकर्षक इंटरनेट प्लॅन्स विशेष दरामध्ये उपलब्ध होतील.
सिन्थॉलकडून ‘विराट’ आव्हान!
त्वचेला जळजळ अथवा हानी न पोहचविणे नॉन-अल्कोहोलिक संमिश्रण असलेले पुरुषांसाठी डिओडरन्टची नाममुद्रा ‘सिन्थॉल’ आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे सख्य टीव्ही झळकणाऱ्या जाहिरातीतून दिसतेच. याबाबत कुणास काही शंका असल्यास ते आगामी चार आठवडय़ात थेट विराटलाच आव्हान देऊ शकतील. हे ‘चॅलेंज-विराट’ अभियान हे विविध माध्यमातून आणि http://www.cinthol.com/deo ¹ या संकेतस्थळामार्फत सुसूत्रित होत आहे. सिन्थॉल डीओ वेगवेगळ्या पाच सुवासांमध्ये प्रत्येकी रु. १७५ किमतीत उपलब्ध आहे.
घर-अंगणाला नैसर्गिक ग्राम्य रंगसंगती
घराची बाल्कनी, छत, अंगण, व्हरांडय़ासारख्या बाहय़ पृष्ठभागासाठी ‘जॉन्सन’ने आपल्या नव्या एंडय़ुरा रस्टोननामक नवीन टाइल्स अस्सल नैसर्गिक माती आणि खडकाची अनुभूती देणाऱ्या रंगसंगती व रचनेत सादर केल्या आहेत. निसर्गाच्या जवळ जाणारी वास्तुरचना आपल्या आधुनिक घरासाठी वापरात आणू पाहणाऱ्यांना भावेल, अशी कल्पकता या टाइल्सच्या रचनेत करण्यात आली आहे. एंडय़ुरा रस्टोनचे किरकोळ मूल्य हे प्रति चौरस फुटांसाठी ८० रुपये असे असून, सर्व जॉन्सन स्टोअर्समध्ये या टाइल्स उपलब्ध झाल्या आहेत.
सुटय़ा भागांच्या ‘नक्कली’विरोधात वाहन उत्पादकांची एकजूट
बजाज, हीरो मोटोकॉर्प, टीव्हीएस, ह्यूंडाइ, महिंद्र अॅण्ड महिंद्र, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, फोक्सवॅगन, व्होल्वो आयशर आदी मारुती सुझूकीचा अपवाद करता सर्व वाहन निर्माते आणि त्यांचे देशभरातील १०७५ विक्रेते शनिवार ८ जून हा ‘नक्कल-विरोधीदिन’ साजरा करीत आहेत. वाहन उत्पादकांची शिखर संघटना ‘सियाम’च्या पुढाकाराने आयोजित या मोहिमेतून बनावट व नक्कल केलेले सुटे भाग वापरून होणाऱ्या वार्षिक २५०० कोटी रुपयांच्या तोटय़ाला पायबंद घातला जाण्याचा उद्देश आहे. मोटारधारकांमध्येही अस्सल सुटे भाग वापरल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत या निमित्ताने जागृती केली जाणार आहे.
अक्षय ‘एव्हररेडी’!
एव्हररेडी इंडस्ट्रीजच्या नव्या ‘अल्टिमा’ बॅटरीज आणि पोर्टेबल मोबाईल चार्जर्सचे अभिनेता अक्षय कुमारने गुरुवारी मुंबईत अनावरण केले. प्रत्येकी २० रु. किमतीच्या उच्च शक्तीच्या अल्कलाइन अल्टीमा बॅटरीज् डिजिटल कॅमेरासाठी उपयुक्त आहेत.