‘विझ एअर प्लस’ लॅपटॉप बॅग्ज
पुढच्या पिढीसाठी उत्पादने दाखल करण्यात सातत्य राखणाऱ्या सॅम्सोनाइटने नव्या डिझाइनच्या आधुनिक लॅपटॉप बॅग्जचे ‘विझ एअर प्लस’ कलेक्शन दाखल केले आहे. तळाशी आणि कोपऱ्यात असलेल्या तीन एअर बंपरने युक्त असून याचे डिझाइन लॅपटॉपला अतिरिक्त सुरक्षा पुरविते. तरुण आधुनिक व्यावसायिकांना साजेशा या रु. ६,२९० ते रु. १२,९९० किमतीच्या बॅग्जच्या कलेक्शनमध्ये एलपी रोलिंग टोटे आणि लहान मोठय़ा आकारातील एलपी ब्रीफकेस आणि एलपी बॅगपॅक यांचाही समावेश आहे.
हगीज् वंडर-पँट्स
बाळाच्या नाजूक त्वेचेच्या संरक्षणाकरिता, सर्वागीण तलमपणा असलेल्या खासरितीने विकसित ‘सॉफ्ट-हग डिझाइन’ने युक्त हगीज् वंडर पँट्स किम्बर्ली-क्लार्क लीव्हर लिमिटेडेने प्रस्तुत केल्या आहेत. या अतितलम डायपर पँट्समध्ये ओलेपणा रोखण्यासाठी अभिनव ब्लू स्पीड ड्राय आवरण आहे आणि हवा खेळती राहावी अशीही या पँट्सची रचना करण्यात आली आहे. या नव्या वंडर पॅट्स स्मॉल ते एक्सएल अशा आकारात सर्वत्र उपलब्ध झाल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा