आभूषणरचनांची ‘इष्टा’कडून मांदियाळी
सार्क देशांमधील सर्वात मोठे आभूषणनिर्मात्या एमेराल्ड समूहाच्या १८ कॅरेट सोने दागिन्यांचे ब्रॅण्ड ‘इष्टा’ने नवनवीन आभूषण रचनांची मांदियाळी आपल्या ‘अल्पना’ या नव्या कलेक्शनद्वारे सादर केली आहे. त्वचेवर सजविलेली जणू चित्ताकर्षक रांगोळीच अशा मनोहारी रचना असलेले ‘अल्पना’ श्रेणीतील दागिने विशेष सोहळ्या-समारंभात तसेच दैनंदिन स्तरावर तसेच आधुनिक तसेच पारंपरिक पेहरावरही वापरास उपयुक्त ठरतील. हे दागिने देशभरातील सर्व ‘इष्टा’ दालनांमध्ये उपलब्ध आहेत.

कोरोनाकडून ‘रसवा’ भारतीय बाजारपेठेत
कोरोना रेमीडिज या औषधी क्षेत्रातील कंपनीने नाविन्यपूर्ण जीवनशैली उत्पादनांच्या क्षेत्रात प्रवेश करताना, बेल्जियमस्थित किटोझाइम कंपनीशी सामंजस्य केले आहे. त्यातून ‘रसवा’ हे शरीरातील अतिरिक्त चरबीचा नैसर्गिकपणे बंदोबस्त करणारे उत्पादन सादर केले आहे. बेल्जियममध्ये निर्मित रसवाचे अनेक विकसित देशात विपणन सुरू असून ते लोकप्रियही ठरले आहे. नव्या उत्पादनाच्या समावेशाने कोरोनाला विक्रीत ७५ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून, वर्षअखेर देशातील पहिल्या ५० कंपन्यांच्या पंक्तीत कंपनीला स्थान मिळविता येईल.

बायोनेअर टॉवर पंखे
घराच्या अंतर्गत सजावटीत उठून दिसणारे आणि थंड हवेबरोबरच विजेची बचतही करणारे कलात्मक टॉवर पंखे ‘बायोनेअर’ नावाने जार्डन कन्झ्युमर सोल्यूशन्स ऑफ इंडिया या कंपनीने प्रस्तुत केले आहेत. या पंख्यांच्या आवाज होत नसल्याने त्याचा वापर कार्यालये,
ग्रंथालये, इस्पितळ आणि शांत वातावरण हव्या असलेल्या ठिकाणी वापर फायदेशीर ठरतो. अनोखी सडपातळ व देखणी रचना असल्याने कार्यालयाच्या शोभेस बाधा येत नाही आणि जागाही कमी व्यापली जाते. शिवाय रिमोट कंट्रोलेमुळे बसल्या जागेवरून नियंत्रण शक्य होते. हे पंखे रु. २२०० ते रु. ५००० या किमतीत सर्वत्र उपलब्ध झाले आहेत.

त्वचा निगेत ‘निव्हिया’ सवाई
जागतिक स्तरावर त्वचेच्या निगेत अग्रेसर नाममुद्रा असलेल्या निव्हियाने शॉवर जेल्सच्या दोन विशेष श्रेणी सादर केल्या आहेत. ‘वॉटर लिली अ‍ॅण्ड ऑइल’ तसेच ‘पॉवर फ्रूट रिलॅक्स’ नावाची ही उत्पादने उन्हाच्या काहिलीचे त्वचेवरील विपरित परिणामांना रोखण्याबरोबरच, त्वचेला एक टिकाऊ सुवास व तजेला प्रदान करते. उन्हापासून त्वचारक्षणाचे ‘सन फेस फ्लूइड’ हे आणखी एक उत्पादन निव्हियाने प्रस्तुत केले आहे. एसपीएफ ३० आणि एसपीएफ ५० अशा दोन प्रकारात उपलब्ध हे उत्पादन सूर्याच्या अतिनील किरणांच्या घातकतेपासून त्वचेचे समर्थपणे रक्षण करते, असा निव्हियाचा दावा आहे. हे दोन्ही प्रकार अनुक्रमे रु. ३४९ आणि रु. ४४९ किमतीत तर शॉवर जेलची किंमत प्रत्येकी रु. १७५ अशी आहे.

स्केचर्सचा स्प्रिंग-समर संग्रह
सहा महिन्यांपूर्वी भारतात दाखल झालेला पादत्राणांचा अमेरिकन ब्रॅण्ड स्केचर्सने उन्हाळी पादत्राणांचा संग्रह बाजारात आणला आहे. वजनाने हलक्या आणि नव्या रंगबिरंगी शूज्ची वैविध्यपूर्ण श्रेणी या निमित्ताने अवतरली आहे. स्केचर्सचा हा संग्रह प्लॅनेट स्पोर्ट्स, रिलायन्स फूटप्रिंट, लाइफस्टाइल, मेट्रो, मोची अशा बडय़ा दालनांमध्ये रु. २,९९९ पासून पुढील किमतीत उपलब्ध झाला आहे.

 होममेड होमस्टार’ स्पर्धा
घराघरात भोजनाची चव व गोडी वाढविण्यासाठी लोकप्रिय असलेल्या ‘डाबर होममेड’ ब्रॅण्डने ‘होममेड होमस्टार’ स्पर्धेचे जगप्रसिद्ध बल्लवाचार्य विकास खन्ना यांच्या निरीक्षणाखाली आयोजन केले आहे. या देशभरातून दाखल झालेल्या ५००० प्रवेशिकांमध्ये पार पडलेल्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून अंतिम ३० स्पर्धकांना निवडण्यात आले. घरातील सुगरणी आणि पाककलेत निपुण असलेल्या हौशी पुरुषांमधून तारे-तारका (होमस्टार) मिळविण्याच्या या स्पर्धेसाठी मुंबईतील फेरीचे परीक्षक म्हणून हॉटेल नोव्होटेलचे प्रमुख शेफ रणबीर ब्रार आणि योगेश उतेकर यांनी काम पाहिले. स्पर्धेची अंतिम फेरी मेमध्ये दिल्लीत होत असून विजेत्यांना न्यूयॉर्कला भेट देण्याची संधी मिळेल.

‘कवाची’ची बचत शेगडी
कवाची समूहाने संपूर्ण भारतीय बनावटीची शेगडी बाजारात आणली असून दणकट स्टील बॉडी असलेल्या या शेगडीत कोळसा/लाकूड याचा वापर करता येतो. मात्र, धूर वा काजळीचा त्रास होत नाही. यासोबत रिचार्जेबल बॅटरी दिली जात असून दोन तासांच्या चार्जिगमध्ये १० तास स्वयंपाक करता येतो. स्पेशल ब्लोअर तंत्रज्ञानामुळे याची ज्योत रेग्युलेटरने कमी जास्त करता येत असल्याने इंधनाची बचत होते. आठवडय़ाचा सरासरी खर्च फक्त ३२ रुपये आहे. याची मूळ किंमत ४ हजार रुपये असून पहिल्या १०० ग्राहकांसाठी २४९० रुपयांत दिली जाणार आहे.