उद्योजकता हे भारताचे बलस्थान आहे. उद्योजक हे देशात नोकऱ्या निर्माण करतात असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या. देशांतर्गत उत्पादन वाढीला चालना देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती आणि सेमीकंडक्टर पॅकेजिंगला प्रोत्साहन देण्यासाठी योजनांद्वारे भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची नवीन अर्थव्यवस्था कल्पकतेवर आधारलेली आहे असे सीतारामन म्हणाल्या.
उद्योग क्षेत्रासाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद
उद्योगांसाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तर पायाभूत सुविधांसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.