शहरी असो वा ग्रामीण जीवनात परिवहनाचे प्रमुख साधन असलेल्या बससेवेची आगामी क्षितिज आणि नवतंत्रज्ञानाच्या आधारे साधले जाणारे नाविन्य या विषयाला वाहिलेल्या ‘बसवर्ल्ड इंडिया २०१३’ या बस आणि कोच उद्योगाच्या विशेष मेळ्याचे मुंबईत येत्या शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे. यंदाची ही बस वर्ल्ड प्रदर्शनाची पाचवी आवृत्ती असून त्याचे आयोजन बस वर्ल्ड इंटरनॅशनलने एडीएस एक्झिबिशनच्या सहयोगाने केले आहे. गोरेगावच्या मुंबई प्रदर्शन संकुलात १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी असे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनाच्या निमित्ताने वाहन निर्माते, उद्योगधुरीण, धोरणकर्ते आणि सनदी अधिकारी यांच्यात चिरस्थायी सार्वजनिक परिवहन व्यवस्था, तिची सुरक्षितता, इंधन किफायतशीरता, नवे संकरण व संक्रमण अशा विविध पैलूंवर सांगोपांग चर्चा होणे अपेक्षित आहे. शिवाय इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स (आयटीएस), जीपीएस, हायब्रिडायझेशन, पर्यावरणाला किमान घात पोहचविणाऱ्या मोटारींच्या तंत्रज्ञानात्मक नाविन्यतेचे आविष्कारही लोकांना पाहावयास मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा