रिटेल किंवा र्मचट आऊटलेटमध्ये डेबिट कार्ड वापरताना एटीएम पिन नोंदविणे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने बंधनकारक केले आहे. १ डिसेंबर २०१३ पासून यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया केवळ एटीएमवरच करावी लागत असे.
अशी आहे नवी प्रक्रिया :
बिल भरताना दुकानदार किंवा कॅशियर पिन नोंदविण्याची सुविधा असलेल्या पाँईट ऑफ सेल(पीओएस) मशिनमध्ये कार्ड स्वाइप करतो किंवा टाकतो.
यानंतर दुकानदार बिलाच्या रकमेची मशिनवर नोंद करतो.
पीओएस मशिन ग्राहकाने पिन नंबर नोंदवावा अशी मागणी करते.
ग्राहकाने त्याचा/तिचा डेबिट कार्डचा एटीएम पिन पीओएस मशीनमध्ये नोंदवितो आणि व्यवहार पूर्ण करतो.
आऊटलेट्समध्ये पीओएस मशिन वापरताना ग्राहकांनी पुढील खबरदारी घेणे गरजेचे आहे :
एटीएम पिन हा गुप्त पिन क्रमांक असून तो कुणासमोरही जाहीर करू नका. कृपया लक्षात ठेवा की एटीएम पिन हा एटीएममधून पसे काढण्यासाठी आवश्यक पिन क्रमांक आहे. त्यामुळे तो कुणालाही सांगू नका.
ग्राहकाने पिन क्रमांकाची स्वत नोंद करावी.
ग्राहकाने कुठल्याही रिटेल आऊटलेटमध्ये पिन क्रमांक दुकानदार/ कॅशियरला सांगू नये किंवा जोरात त्याचा उच्चार करू नये.
पिन क्रमांक नोंदवताना दुसऱ्या हाताचा आडोसा करा. जेणेकरून इतरांना पिन क्रमांक दिसणार नाही.

Story img Loader