युरेका फोब्र्ज
आगप्रतिबंधक उत्पादनात
वॉटर प्युरिफायर क्षेत्रातील आघाडीच्या युरेका फोर्ब्सने आता आग प्रतिबंधक उपकरण निर्मिती क्षेत्रात शिरकाव केला आहे. यासाठी सादर करण्यात आलेले उपकरण सहज हाताळता येणारे असून त्याचे वजन २५० ग्रॅम आहे. या उत्पादनासाठी वॉरंटी सुमारे २० वर्षांची आहे. शिवाय १ कोटी रुपयांचा विमाही आहे. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्या या उत्पादनाची किंमत अनुक्रमे ४,९९० आणि ७,९९० रुपये आहे.
ओरिफ्लेमचे नवे फ्रेग्रन्स
ओरिफ्लेमने अधिक सुगंधी फ्रेगरन्स बाजारात आणले आहेत. पुरुषांच्या वापरासाठी ते विविध सुगंधी प्रकाराद्वारे सादर करण्यात आले आहे. त्यांची किंमत १,५९० रुपयांपासून पुढे आहे. नेटिव्ह फोर्स इ डे नावाने सादर बाजारात दाखल केलेले हे फ्रॅगरन्स ७५ मिली आकारात आहे. केशरी आणि हिरव्या द्रवयुक्त प्रकारात ते उपलब्ध आहे.
व्हीआयपीद्वारे खास महिलांसाठी पर्सेस
कॅप्रिजने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करताना महिलांसाठी आकर्षक हॅण्डबॅग तयार केल्या आहेत. मुळच्या इटलीचा हा ब्रॅण्ड भारतात व्हीआयपीमार्फत आयात करण्यात आला आहे. अत्याधुनिक कॅप्रिज बॅगांमध्ये वैशिष्टय़पूर्ण शृंखला सादर करण्यात आली आहे. यासाठी निराळा आकार, रंग, डिझाईन यांचा उपयोग करण्यात आला आहे. दोन हजार रुपयांपासून असलेली ही उत्पादने लाईफस्टाईल, सेंट्रल, व्हीआयपी लाऊन्जेस आदी दालनांमध्ये उपलब्ध आहेत.
इन्टेक्सची अॅक्वा स्मार्टफोन
इन्टेक्सने अॅक्वा ५.० हा नवा स्मार्टफोन सादर केला आहे. प्रथमच ५ इंची अॅण्ड्रॉईड तंत्रज्ञानावर सादर करण्यात आलेला हा फोन ड्वेल कोअर प्रोससरयुक्त आहे. याद्वारे सीडीएमएवर थ्रीजी आणि जीएसएमवर टूजी सेवा उपलब्ध आहे. रिअर ५ आणि फ्रन्ट १.३ मेगा पिक्सल कॅमेरा असणाऱ्या या मोबाईलची मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढविता येते. ९,९९० रुपये याची किंमत आहे.
लहानग्यांसाठी टूथपेस्ट
ओरिफ्लेमने खास लहान मुलांसाठी टूथपेस्ट तयार केली आहे. ओरिफ्लेम ऑप्टीफ्रेश किड्स फ्लोराईड या नावाने सादर करण्यात आलेली ही टूथपेस्ट मुलांच्या नाजुक हिरडय़ा तसेच दात यांना समोर ठेवून तयार करण्यात आली आहे. दात बळकटीसाठी फ्लोराईडचा अधिक उपयोग होतो. यामध्ये स्ट्रॉबेरीची चव असणारी टूथपेस्टही सादर करण्यात आली आहे. ही पेस्ट ८५ रुपयांना उपलब्ध आहे.
आकर्षक पॅकमध्ये मिष्टान्न
केव्हिनकेअरच्या गार्डन या ब्रॅण्डने तयार रसगुल्ला आणि गुलाब जामुन बाजारात आणले आहेत. कंपनीने नुकतेच शरिरस्वास्थासाठी डायेट विविध स्नॅक पदार्थ सादर केले होते. आता नव्या आणि आकर्षक प्रकारात हे दोन्ही गोड पदार्थ ग्राहकांसाठी दाखल केले आहेत. शुद्ध तुपात तयार केलेले हे मिष्टान्न आघाडीच्या सर्वच दालनांमध्ये उपलब्ध आहेत. एक किलोच्या गुलाब जामुनची किंमत रु. १७० आणि रसगुल्लाची किंमत रु. १५० आहे. विविध चव प्रकारातील सोनपापडीही सध्या उपलब्ध आहे.
पिल्सबेरीचे चॉको केक
खाद्यपदार्थ निर्मितीतील आघाडीच्या पिल्सबेरीने चॉको केक तयार करण्यासाठी लागणारे तयार जिन्नस बाजारात आणले आहे. याद्वारे अवघ्या काही मिनिटांमध्येच चॉको केक तयार केला जातो. पिल्सबेरीच्या कस्टर्ड पावडरद्वारे व्हॅनिला केकही बनविता येतो. विविध चव तसेच वजनांमध्ये हे खाद्य उत्पादन कंपनीने सादर केले आहे.