भरपूर पोषणमूल्य असलेल्या आक्रोड तेलाच्या गुणांनी युक्त हेअर सीरम आपल्या ‘स्ट्रिक्स’ या नाममुद्रेअंतर्गत हायजिनीक रिसर्च इन्स्टिटय़ूट प्रा. लि. या कंपनीने दाखल केले आहे. विशेषत: हिवाळ्यात दुतोंडी केस, गुंतलेले केस आणि केसांचे तुटणे अशा समस्यांपासून हे हेअर सीरम मोकळीक देते आणि सदा चमकदार व मऊशार केसांची मागणी पूर्ण करते. स्ट्रिक्स हेअर सीरमच्या १०० मि.लि. बाटलीकरिता १७५ रुपये किंमत आहे.
फास्टट्रॅकवर २५% सवलत
बॅग्जचे २०० प्रकारचे कलेक्शन, डोळ्यांना सुखावणारे मीन मशीन, आय स्पोर्ट्स, बीच आणि टॅटू सनग्लासेसचे कलेक्शन आणि जोडीला लेदर बेल्ट्स व वॉलेट्स अशा अनुक्रमे ७०० रु., ४५० रु. आणि १८० रु. अशा आकर्षक किमतीला सुरू होणाऱ्या उत्पादनांवर सरसकट २५ टक्क्यांची सवलत फास्टट्रॅकने देऊ केली आहे. येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही फास्टट्रॅक स्टोअर्स, शॉपर्स स्टॉप, सेंट्रल, लाइफस्टाइल, पँटालुन्स, वेस्टसाइड वगैरे मल्टिब्रॅण्ड स्टोअर्समध्ये अथवा नजीकच्या वर्ल्ड ऑफ टायटन किंवा टायटन आय प्लस स्टोअर्समधून ही सवलतीतील फास्टट्रॅक उत्पादने मिळविता येतील.
हर्बल एनर्जी बूस्टर
एल्डर हेल्थकेअर लि. या आघाडीच्या औषधी कंपनीने एनर्जी बूस्टर या वेगाने विकसित होत असलेल्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. भारतात पुरुषांसाठी शक्तिवर्धक उत्पादनात ५ टक्के बाजारहिस्सा असलेल्या ‘स्टे ऑन’ या मेसर्स श्री मारुती हर्बल्स या कंपनीच्या उत्पादनाच्या वितरणाचे हक्क एल्डरने मिळविले आहेत. यामुळे हे उत्पादन आता देशभरात सात लाखांहून अधिक विक्रीकेंद्रांच्या जाळ्यातून उपलब्ध होईल. आगामी वर्ष-दोन वर्षांत याच धाटणीची अनेक हर्बल उत्पादने एल्डरकडून बाजारात आणली जाणार आहेत. तिशीपुढील पुरुषांसाठी असलेले ‘स्टे ऑन’ हे सध्या या बाजार वर्गवारीतील तिसरे मोठे उत्पादन असून, वर्षभरात दुपटीने तर दोन वर्षांत त्याची विक्री उलाढाल रु. ५० कोटींवर नेण्याचे एल्डरचे लक्ष्य आहे.
ब्रिटानियाचे मसाला ताक
विश्वासार्ह खाद्य ब्रॅण्ड ब्रिटानियाने दुग्धजन्य उत्पादनांची श्रेणी विस्तारताना ‘मसाला ताक’ प्रस्तुत केले आहे. जीरा, कडी पत्ता आणि आले मिसळलेले घरी बनविलेल्या ताकासारखी चव असलेले हे उत्पादन १५० मिलिच्या आकर्षक पॅकमध्ये रु. १५ किमतीत उपलब्ध झाले आहे.
ट्रॅक्स आरएक्स स्पीड सायकल
गोविंद रबर लिमिटेडची सहयोगी कंपनी जीआरएल इंटरनॅशनलने ‘ट्रॅक्स आरएक्स स्पीड’ ही उच्च श्रेणीची आयातीत सायकल बाजारात दाखल केली आहे. १८ स्पीडच्या या सायकलमध्ये नायलॉन टायरसह रिम, डिस्क ब्रेक यंत्रणा, क्विक रिलीज सीट बोल्ट, फ्रेम व फोर्कवरील संस्पेन्शन यंत्रणा, साइड स्टँड अशी वैशिष्टय़े सामावली आहेत. या सायकलची किंमत ८,००० रुपये आहे. ‘ट्रॅक्स-सायक्लोप्स २६’ ही अन्य ४,००० रुपये किमतीची सायकलही कंपनीने प्रस्तुत केली आहे. जीआरएलचा लुधियाना येथील सायकल निर्मिती प्रकल्पाचा विस्तार मार्च २०१३ पर्यंत पूर्ण होणार असून, निर्मिती क्षमता सध्या प्रति माह २५ हजारावरून चौपटीने वाढून १ लाखावर जाईल.
व्हाइट ग्लो ओटमिल
सौंदर्यवर्धक उत्पादनांमधील अग्रेसर नाममुद्रा लोटस हर्बलने तेजस्वी व मुलायम त्वचेसाठी व्हाइट ग्लो ओटमिल आणि योगर्ट स्किन व्हाइटनिंग स्क्रब अशी नवीन उत्पादने आणली आहेत. यातील स्क्रब त्वचेतील मृत पेशी, अशुद्धी, डाग हळूवारपणे दूर करते आणि त्वचेला उजळपणा देते. ही उत्पादने १०० ग्रॅमच्या पॅकमध्ये रु. १६५ किमतीला उपलब्ध झाली आहेत.
ऑस्टर कॉफी मेकर
ग्राहकोपयोगी उपकरण क्षेत्रातील जार्डन कन्झ्युमर सोल्युशन्स ऑफ इंडिया प्रा. लि. कंपनीने जगभरात लोकप्रिय ‘ऑस्टर’ ब्रॅण्डअंतर्गत कॉफी मेकरची विस्तृत श्रेणी प्रस्तुत केली आहे. फिल्टर कॉफीचा आस्वाद घरात बसून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे उत्पादन म्हणजे पर्वणीच ठरेल. कॉफी मेकरमधील पाण्याची पातळी दर्शविणारी डय़ुएल वॉटर विंडो, पॉज अॅण्ड सव्र्ह सुविधा, सुलभतेने काढता येण्याजोगे फिल्टर बास्केट, बंद-चालू स्थिती दर्शविणारा स्विच वगैरे याची अनोखी वैशिष्टय़े आहेत. दोन मॉडेल्समध्ये हे उत्पादन अनुक्रमे रु. २९९५ आणि रु. १९९५ किमतीला उपलब्ध झाले आहे.
अॅट होममध्ये निम्म्या किंमतीत खरेदीची संधी
विविध वस्तू विक्रीचे आघाडीचे साखळी दालन असलेल्या अॅट (@) होममध्ये ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतीत खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीच्या देशभरातील २० दालनांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये सोफा, बेडरूम सेट, डायनिंग टेबल आदी घरातील फर्निचर तसेच दिवाणखान्यातील पडदे, कुशन, कारपेट आदी वस्तूंचाही समावेश आहे. घराच्या सजावटीत भर घालणाऱ्या शोभेच्या वस्तूंचाही यात अंतर्भाव आहे. मुंबई तसेच ठाणे येथेही सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत ही योजना २४ फेब्रुवारीपर्यंत सुरू असून एचडीएफसी क्रेडिट कार्डधारकांना अतिरिक्त ५ टक्के सवलतही मिळणार आहे.
हिमालयाचे बेबी मसाज तेल
आयुर्वेद औषध निर्मितीतील हिमालयाने लहान मुलांचे मसाज तेल सादर केले आहे. यामुळे त्वचा शुष्क होण्यापासून संरक्षण होते. तसेच या तेलाच्या नियमित मालिशने बाळाची श्वसन यंत्रणा, पचन संस्था आणि अभिसरण यंत्रणा मजबूत होत असल्याचा दावा केला गेला आहे. याध्ये कंट्री मॅलोसारख्या सामग्रीचा हर्बल तत्वांचा समावेश आहे. चेरी, व्हेटिव्हर, बारबेडॉस अॅलो तसेच ऑलिव्ह ऑईलचा यात अंतर्भाव आहे. हे ऑईल १००, २०० व ३०० मिलीमध्ये अनुक्रमे रु.८५, रु. १४५ आणि रु. २१५ किमतीत उपलब्ध झाले आहे.
नाईलचे हर्बल शॅम्पू
केविन केअरचा अग्रगण्य हेअर कलर ब्रॅण्ड असलेल्या नाईल नॅचरल शॅम्पूचा नवा वैशिष्टय़पूर्ण शॅम्पू बाजारात आला आहे. यामध्ये अॅलो वेरा, वॉटर लिली, लिंबू व आवळ्यांच्या तत्त्वांचा समावेश आहे. याद्वारे केस नरम तसेच चमकदार राखण्यास मदत होते. यातील आवळ्याचा अंश केसांना नरम तर लिंबाचा समावेश कोंडय़ांपासून मुक्तता देतो. पारदर्शक बाटलीतील या शॅम्पूची किंमत ४५ रुपयांपासून पुढे आहे.
स्केचर्स भारतात दाखल
१०० हून जास्त देशांमध्ये लोकप्रिय पादत्राणांची नाममुद्रा स्केचर्स भारतात दाखल झाली आहे. शहरी वर्गाच्या बदलत्या राहणीमानाला लक्षात घेऊन, कामगिरी, जीवनशैली आणि स्पोर्टी लूक अशा तीन अंगांना सामावणारे स्केचर्स शूज हे सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी विविध ३५०० हून अधिक स्टाइल्समध्ये सादर झाली आहेत. देशातील आघाडीच्या मल्टिब्रॅण्ड स्टोअर्स तसेच मायंत्रा. कॉम आणि जबाँग.कॉम या पोर्टल्सवर स्केचर्स शूज मिळविता येतील.
बाजारात नवे काही.. : स्ट्रिक्स हेअर सीरम
भरपूर पोषणमूल्य असलेल्या आक्रोड तेलाच्या गुणांनी युक्त हेअर सीरम आपल्या ‘स्ट्रिक्स’ या नाममुद्रेअंतर्गत हायजिनीक रिसर्च इन्स्टिटय़ूट प्रा. लि. या कंपनीने दाखल केले आहे. विशेषत: हिवाळ्यात दुतोंडी केस, गुंतलेले केस आणि केसांचे तुटणे अशा समस्यांपासून हे हेअर सीरम मोकळीक देते आणि सदा चमकदार व मऊशार केसांची मागणी पूर्ण करते.
First published on: 29-01-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New thing arrival in market