भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळे भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक मंगळवारी त्याच्या महत्त्वाच्या टप्प्यापासून विचलित झाले. सलग दुसऱ्या सत्रातील मोठय़ा घसरणीमुळे सेन्सेक्स २४ हजारांवर येऊन ठेपला. तर निफ्टीने त्याचा ७,३०० चा स्तरही सोडला. २६६.४४ अंश घसरणीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४,०२०.९८ वर तर ८९.०५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,२९८.२० पर्यंत आला. सेन्सेक्सचा मंगळवारचा स्तर हा २१ जानेवारीनंतरचा सर्वात कमी राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१५-१६ मधील ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात झालेल्या वाढीची कोणतीही दखल गुंतवणूकदारांनी आठवडय़ातील दुसऱ्या दिवशीच्या व्यवहारादरम्यान घेतली नाही. देशाचा गेल्या आर्थिक वर्षांतील विकास दर ७.६ टक्के या पाच वर्षांच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचल्याची आकडेवारी सोमवारी उशिरा जाहीर झाली. मात्र गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करत उलट कॉग्निझन्टने व्यक्त केलेल्या भविष्यातील व्यवसाय भीतीची अधिक धास्ती दर्शविली.

घसरणीसह नव्या सप्ताहाची सुरुवात करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचा मंगळवारचा प्रारंभही २४,०७६.८५ या किमान स्तरावर झाला. सत्रात सेन्सेक्स २४ हजाराच्या खाली येत २३,९१९.४७ या सत्रातील तळातही पोहोचला. परकी चलन विनिमय व्यासपीठावरील डॉलरच्या तुलनेतील रुपयाची ६८ खालील घसरणही भांडवली बाजाराच्या मोठय़ा घसरणीस तेवढीच कारणीभूत ठरली.

सेन्सेक्सची सोमवारची घसरण ३३० अंशांची होती.

सेन्सेक्समधील ३० पैकी २० समभागांचे मूल्य रोडावले. यामध्ये कोल इंडिया, टाटा मोटर्स, टीसीएस, डॉ. रेड्डीज, इन्फोसिस, स्टेट बँक, मारुती सुझुकी, अ‍ॅक्सिस बँक, सिप्ला, विप्रो, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, एचडीएफसी बँक हे आघाडीवर राहिले. तर मूल्य वाढलेल्या समभागांमध्ये ल्युपिन, सन फार्मा, एनटीपीसी, ओएनजीसी, गेल, बजाज ऑटो, टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश राहिला.

मुंबई शेअर बाजारात क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद (२.४७%), वाहन (१.७८%), स्थावर मालमत्ता (१.५०%), भांडवली वस्तू (१.३२%), बँक (१.२३%) हे घसरले. मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.९१ व १.३४ टक्क्यांनी खाली आले. लुनार नववर्षांनिमित्त सुटी असल्याने चीनमधील भांडवली बाजार बंद होते. मात्र जपानचा निक्केई तब्बल ५.४० टक्क्यांनी कोसळला.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अस्वस्थता

मुंबई शेअर बाजारातील क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक फटका हा माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाला बसला. कॉग्निझन्टच्या धक्कादायक संकेतांमुळे एकूणच हा निर्देशांक सर्वाधिक ३.४० टक्क्यांनी घसरला.या निर्देशांकातील केवळ वख्रांगीच मूल्यवाढ राखू शकला. इतर सर्व आयटी कंपन्यांमध्ये ६.४५ टक्के घसरण झाली. संपूर्ण २०१६ मध्ये ९.९ ते १४.३ टक्के वाढीने व्यवसायाची शक्यता कॉग्निझन्टने व्यक्त केल्याने बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला.

  • टेक महिंद्र

रु. ४४७.६५     ३ ४.८९%

  • एचसीएल टेक

रु. ८११.४०     ३ ४.५२%

  • टीसीएस

रु. २२८१.४५    ३ ३.६८%

  • इन्फोसिस

रु. ११०९.३०    ३ ३.४६%

  • माइंडट्री

रु. १४८०.९०    ३ ३.०३%