व्यवहारात डॉलरच्या तुलनेत ६२ ला गवसणी घालणारा रुपया दिवसअखेर अवघ्या दोन पैशांनी वधारला. भारतीय चलन आता ६१.९४ वर स्थिरावले असले तरी त्याचा गेल्या नऊ महिन्यांतील नीचांक मात्र कायम आहे. रुपया यापूर्वी ५२.४५ या २० फेब्रुवारीच्या टप्प्यावर होता; तर वधारत्या डॉलरमुळे माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ होऊन एकूण सेन्सेक्ससह निफ्टीही गेल्या दोन दिवसांच्या घसरणीनंतर प्रथमच वधारले. सेन्सेक्स २८,०५० पुढे तर निफ्टी ८,४०० पुढे राहण्यात यशस्वी झाला.