सायंकाळी जाहिर होणाऱ्या जनमत चाचण्यांच्या अपेक्षित निकालावर स्वार होत भांडवली बाजारांनी सप्ताहारंभीच नवे शिखर स्वार केले. व्यवहाराच्या मध्यातच सेन्सेक्स २३,५०० तर निफ्टी ७ हजार पार करता झाला. निवडणुकीनंतरच्या अंदाजाच्या जोरावर दोन्ही प्रमुख निर्देशांक सलग दुसऱ्या व्यवहारात विक्रम स्थापन करते झाले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी एकाच व्यवहारात तब्बल ५५६.७७ अंश वाढत थेट २३,५५१.०० वर पोचोचला. तर त्याचा व्यवहारातील सर्वोच्च स्तर हा २३,५७२.८८ होता. सलग दुसऱ्या दिवशी संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर लावला.
सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीनेही सोमवारी सलग दुसऱ्यांना नवा विक्रम स्थानप केला. असे करताना निफ्टी एकाच दिवसात १.५५.४५ अंशांची झेप घेत ७ हजार पार करत ७,०१४.२५ वर बंद झाला. व्यवहारात त्याचा सर्वोच्च टप्पा ७,०२०.७५ होता.
मुंबई शेअर बाजार शुक्रवारी २३ हजाराला स्पर्श केल्यानंतर त्यापेक्षा खालच्या पातळीवर सप्ताहअखेर नोंद करता झाला होता. यावेळी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १,२६८.७८ कोटी रुपयांची खरेदी केली होती. सोमवारी त्याने हा टप्पा सुरुवातीलाच पार करत दुपारपूर्वीच सर्वोच्च झेप घेतली. निफ्टीनेही त्याचा ७ हजाराचा जादुई आकडा दुपारी २ च्या सुमारास गाठला. परकी चलन व्यवहारात गेल्या दहा महिन्याच्या उच्चांकाला गेलेल्या रुपयाचाही भांडवली बाजारावर परिणाम दिसून आला.
मुंबई शेअर बाजारातील १८९ कंपनी समभागांनी गेल्या वर्षभरातील उच्चांकी मूल्य कमाविले. यामध्ये अ‍ॅक्सिस बँक, कोल इंडिया, रिलायन्स, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, एल अ‍ॅण्ड टी या सेन्सेक्समधील ब्ल्यू चिप कंपन्यांचाही क्रम राहिला.

रुपयाची १० महिन्यातील उच्चांकापासून माघार
नव्या आठवडय़ाच्या पहिल्या सत्रात तब्बल १० महिन्यातील उच्चांकापासून माघार घेत रुपया सोमवारी अवघ्या एक पैशाने मात्र घसरला. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ६०.०५ पर्यंत खाली आले. परकी चलन व्यासपीठावर रुपयाचा प्रवास सुरुवातीलाच ६० च्या वर पोहोचला. यावेळी तो ५९.५१ अशा गेल्या १० महिन्यातील उच्चांकावर होता. यापूर्वी चलन २९ जुलै २०१३ मध्ये ५९.४५ या वरच्या टप्प्यावर होते.

सराफा बाजारात संमिश्र हालचाल
भांडवली बाजार आणि परकी चलन बाजारात सोमवारी मोठी हालचाल नोंदविली जात असताना मुंबईच्या सराफा बाजारात मात्र दरांची सप्ताहारंभी संमिश्र हालचाल राखली गेली. सोने ८५ रुपयांनी घसरत तोळ्यामागे २९,७०५ रुपयांवर येऊन ठेपले. तर चांदीच्या किलोच्या भावात मात्र २१५ रुपयांची वाढ होऊन पांढऱ्या धातूला ४२,६५५ रुपये भाव मिळाला.

महागाई तीन महिन्याच्या उच्चांकावर
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात महागाईचा दर गेल्या तीन महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सोमवारी जाहिर झालेल्या किरकोळ महागाई निर्देशांकानुसार, हा दर ८.५९ टक्के झाला आहे. मार्चमध्ये तो ८.३१ टक्के होता. यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत येत्या महिन्यात जाहिर होणाऱ्या पतधोरणात व्याजदराची कपातीची आशा पुन्हा मावळली आहे. किरकोळ महागाई निर्देशांकामध्ये अन्नधान्याच्या महागाईचा दर मार्चमधील ९.१० टक्क्य़ांवरून यंदाच्या एप्रिलमध्ये वधारून ९.६६ टक्के झाला आहे.

औद्योगिक उत्पादन नकारात्मकच
अर्थव्यवस्था न सुधाराचे लक्षण सोमवारी जाहिर झालेल्या औद्योगिक उत्पादन दराने अधिक स्पष्ट झाले. सलग दुसऱ्या महिन्यात नकारात्मक राहताना औद्योगिक उत्पादनाचा दर मार्चमध्ये ०.५ टक्के राहिला आहे. भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रात सुमार कामगिरी राहिल्याने २०१३-१४ मधील दर ०.१ टक्क्य़ावर आला आहे.

Story img Loader