सायंकाळी जाहिर होणाऱ्या जनमत चाचण्यांच्या अपेक्षित निकालावर स्वार होत भांडवली बाजारांनी सप्ताहारंभीच नवे शिखर स्वार केले. व्यवहाराच्या मध्यातच सेन्सेक्स २३,५०० तर निफ्टी ७ हजार पार करता झाला. निवडणुकीनंतरच्या अंदाजाच्या जोरावर दोन्ही प्रमुख निर्देशांक सलग दुसऱ्या व्यवहारात विक्रम स्थापन करते झाले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी एकाच व्यवहारात तब्बल ५५६.७७ अंश वाढत थेट २३,५५१.०० वर पोचोचला. तर त्याचा व्यवहारातील सर्वोच्च स्तर हा २३,५७२.८८ होता. सलग दुसऱ्या दिवशी संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर लावला.
सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीनेही सोमवारी सलग दुसऱ्यांना नवा विक्रम स्थानप केला. असे करताना निफ्टी एकाच दिवसात १.५५.४५ अंशांची झेप घेत ७ हजार पार करत ७,०१४.२५ वर बंद झाला. व्यवहारात त्याचा सर्वोच्च टप्पा ७,०२०.७५ होता.
मुंबई शेअर बाजार शुक्रवारी २३ हजाराला स्पर्श केल्यानंतर त्यापेक्षा खालच्या पातळीवर सप्ताहअखेर नोंद करता झाला होता. यावेळी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १,२६८.७८ कोटी रुपयांची खरेदी केली होती. सोमवारी त्याने हा टप्पा सुरुवातीलाच पार करत दुपारपूर्वीच सर्वोच्च झेप घेतली. निफ्टीनेही त्याचा ७ हजाराचा जादुई आकडा दुपारी २ च्या सुमारास गाठला. परकी चलन व्यवहारात गेल्या दहा महिन्याच्या उच्चांकाला गेलेल्या रुपयाचाही भांडवली बाजारावर परिणाम दिसून आला.
मुंबई शेअर बाजारातील १८९ कंपनी समभागांनी गेल्या वर्षभरातील उच्चांकी मूल्य कमाविले. यामध्ये अॅक्सिस बँक, कोल इंडिया, रिलायन्स, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, एल अॅण्ड टी या सेन्सेक्समधील ब्ल्यू चिप कंपन्यांचाही क्रम राहिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा