प्राप्तिकर दरात कोणताही बदल न करता सर्वसामान्य करदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५० हजारांनी वाढविण्याची घोषणा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी केली. चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जेटली यांनी लोकसभेमध्ये मांडला. मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प. सामान्य मध्यमवर्गीय करदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा कितीने वाढविण्यात येणार, याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, जेटली यांनी थोड्या आखडत्या हातानेच करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत ५० हजारांनी वाढ केली.
चालू आर्थिक वर्षात करमुक्त उत्पन्न आता दोन लाखांवरून अडीच लाख झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हीच मर्यादा अडीच लाखावरून तीन लाख झाली आहे.
गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱया करदात्यांनाही जेटली यांनी काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गृहकर्जावरील दोन लाख रुपयांचे व्याज दिल्याचा फायदा प्राप्तिकरात मिळणार आहे. आत्तापर्यंत ही मर्यादा दीड लाख रुपये होती. त्याचबरोबर प्राप्तिकरातील ८० (सी) च्या माध्यमातून मिळणाऱया सवलतीची मर्यादाही एक लाखावरून आता दीड लाख करण्यात आली आहे.
प्राप्तिकरदात्यांना अल्पदिलासा; करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ
प्राप्तिकर दरात कोणताही बदल न करता सर्वसामान्य करदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५० हजारांनी वाढविण्याची घोषणा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी केली.
First published on: 10-07-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No change in income tax rates