देशाची लोकसंख्या सुमारे १२२ कोटी, त्यात ८९ कोटी मोबाईल फोन , ३१ कोटी लोकांची बचत खाती,  दोन कोटी डिमॅट खातेदार वगरे मेंदूला झिणझिण्या आणणारी आकडेवारी आपण अनेक वेळा ऐकत असतो. वेगवेगळय़ा बँकेत बचत खाती उघडायची असतील तर प्रत्येक ठिकाणी ‘केवायसी’ (नो युवर कस्टमर) कागदपत्रे द्यावी लागतात. शेअर बाजारात मात्र तसे नाही. आपण कितीही ब्रोकरकडे ट्रेडिंग खाती उघडली, कितीही डीपींकडे डिमॅट खाती उघडली तरी केवळ सुरुवातीला जिथे ट्रेडिंग किंवा डिमॅट खाते उघडले असेल तिथे दिलेली केवायसी कागदपत्रे पुढील ठिकाणी आपसूक वापरली जातात. त्यामुळे परत परत ती गुंतवणूकदाराने देण्याची गरज नसते.
ही सोय झाली आहे एक जानेवारी २०१२ पासून.  एकत्रितपणे हा सर्व गुंतवणूकदारांचा केवायसी तपशील साठवून त्याचे जतन करणारी संस्था म्हणजे केआरए- KRA म्हणजेच   KYC Registration Agency. . उदाहरणार्थ अशापकी एक म्हणजे CVL अर्थात सीडीएसएल व्हेंचर्स लिमिटेड. १,००,०५,७३७ गुंतवणूकदारांचा KYC तपशील सांभाळणाऱ्या या संस्थेच्या बेलापूर कार्यलयाला नुकतीच दिलेली भेट चक्रावून सोडणारी होती. हा सर्व डोलारा समर्थपणे सांभाळणाऱ्या मंडळींचे कौतुक वाटल्यावाचून रहात नाही. प्रति दिनी सुमारे ७,००० कागदपत्रे  नोंदणीसाठी सीव्हीएलकडे येत असतात. त्याची तत्परतेने पुढील व्यवस्था करण्यासाठी इथे १५५ कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करीत असतात. ग्राहकाकडून आलेली केवायसी कागदपत्रे स्कॅन करून डीपी किंवा शेअर ब्रोकर नंतर सीव्हीएलकडे पाठवतो. ती प्राप्त होताच सीव्हीएलची मंडळी त्यातील तपशील पडताळून पाहतात आणि संबंधित ग्राहकाचा पॅन क्रमांक हाच त्याचा नोंदणी क्रमांक असे मानून संगणकात त्याची नोंद होते. ग्राहकाला ही नोंद झालेली पाहायची असेल तर त्याने  http://www.cvlindia.com  या वेबसाइटवर जाऊन आपल पॅन क्रमांक टाकला की  verified by CVLKRA  असा संदेश दिसतो. मुख्य अधिकारी संजीव काटे आणि त्यांचे  सहकारी संतोष पाटील व राकेश भोवर यांच्याकडून ही सर्व प्रणाली कशा प्रकारे काम करते हे समजून घेणे हा एक सुखद अनुभव होता.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केआरए म्हणजे काय ?
केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सी. जिची सेबीकडे  KYC Registration Agency Regulations 2011 या नियमानुसार नोंदणी झालेली असते. केआरए गुंतवणूकदारांच्या  केवायसीचा सर्व  तपशील  एकत्रितपणे संकलित करून ठेवते जो सेबीद्वारा मान्यताप्राप्त मध्यस्थानी गोळा केलेला असतो
‘केआरए’चे काम व जबाबदाऱ्या कोणत्या?
मध्यस्थाने गुंतवणूकदारांकडून जी केवायसी कागदपत्रे जमा केली असतील ती छायाचित्रांकित करायचे काम ‘केआरए’ करते. त्यानंतर गुंतवणूकदाराला पोच पावती पाठविते किंवा काही त्रुटी असतील तर तसे कळवते. ‘केवायसी’मध्ये काही बदल झालेले असतील तर गुंतवणूकदार त्याप्रमाणे मध्यस्थाला कळवतो व त्याआधारे  केआरए त्याची नोंद घेते. अशा रीतीने एकाच कामाची पुनरावृत्ती होत नाही, गुंतवणूकदाराना त्रास होत नाही व केवायसी बाबतचे बदल एकाच स्तरावर नोंदवले जातात.
‘केआरए’ची आवश्यकता काय?
गुंतवणूकदाराने कितीही डिमॅट खाती दुसऱ्या कुठल्याही मध्यस्थाकडे (डीपी किंवा शेअर ब्रोकर) उघडले तरी एकदा केलेली केवायसी प्रक्रिया पुरेशी असते. ‘केआरए’मुळे गुंतवणूकदाराचा हा त्रास वाचतो. तसेच एका सामायिक पद्धतीने हा सर्व तपशील साठवलेला असल्याने नियमांची पूर्तता (Compliance) अधिक परिणामकरीत्या करता येते