राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास कार्यक्रमांसाठी यंदा भरीव म्हणजे जवळपास १३०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासीबहुल नाशिक जिल्ह्याला यातून अधिकाधिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. अर्थसंकल्पात आदिवासी भागातील गावे, वाडय़ा व वस्त्यांच्या विकासासाठी ‘ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युतीकरण, रस्ते व गटारांचे बांधकाम तसेच इतर मूलभूत सुविधा उपल्ध करून देण्यात येतात. आगामी वर्षांत या योजनेसाठी २४५.२३ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. या वाडय़ा-वस्त्यांना वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पाने आगामी वर्षांसाठी ८२.८९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या ‘सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजने’करिता २०१३-१४ सालासाठी २०३.६८ कोटींची तरतूद केली गेली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ४३७ आश्रमशाळांपैकी आणखी १८६ शाळांच्या इमारती व वसतिगृहांच्या बांधकामाकरिता अर्थसंकल्पात ५०१.३८ लाख रुपयांची तरतूद केली गेली आहे.

land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Ramshej Fort Conservation, Shivkarya Gadkot Sanstha Campaign, Ramshej Fort,
नाशिक : रामशेज किल्ला संवर्धनार्थ अशी ही धडपड, शिवकार्य गडकोट संस्थेची श्रमदान मोहीम
Story img Loader